Home Breaking News chandrapur dist@ news • जनसामान्यांचे प्रश्न मार्गी लागण्यासाठी उद्या होतोय चंद्रपूरात खा.प्रतिभा...

chandrapur dist@ news • जनसामान्यांचे प्रश्न मार्गी लागण्यासाठी उद्या होतोय चंद्रपूरात खा.प्रतिभा धानोरकरांचा जनता दरबार

114

chandrapur dist@ news
• जनसामान्यांचे प्रश्न मार्गी लागण्यासाठी
उद्या होतोय चंद्रपूरात खा.प्रतिभा धानोरकरांचा जनता दरबार

चंद्रपूर -किरण घाटे

चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा क्षेत्राच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांनी जनसामान्यांचे प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन निवडणूकी दरम्यान दिले होते. त्या आश्वासनाची पूर्तता करण्याच्या हेतूने व नागरिकांच्या प्रलंबित प्रश्नांची दखल घेण्याच्या उद्देशाने त्यांच्या उपस्थितीत उद्या बुधवार दि.19 जुनला सकाळी 10 ते 1 वाजेच्या कालावधीत जनता दरबारचे आयोजन करण्यात आले आहे सदरहु जनता दरबार चंद्रपूर आकाशवाणी रोड येथील त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात होत आहे.नागरीकांनी येत असतांना लेखी निवेदन घेवून उपस्थित राहावे असे आवाहन खासदार प्रतिभा धानोरकर यांनी एका प्रसिध्दी पत्रकातून केले आहे.