Home Breaking News Varora city@ news •करोड रुपये खर्च करून मासे विक्री बाजारपेठेची इमारत...

Varora city@ news •करोड रुपये खर्च करून मासे विक्री बाजारपेठेची इमारत धुळखात • मासे विक्री होतात रहदारीचे रस्त्यावर •परिसरात सर्वत्र दुर्गंधी •नगर परिषद प्रशासनाची शून्य कारवाही

190

Varora city@ news

•करोड रुपये खर्च करून मासे विक्री बाजारपेठेची इमारत धुळखात

•मासे विक्री होतात रहदारीचे रस्त्यावर

•परिसरात सर्वत्र दुर्गंधी

• नगर परिषद प्रशासनाची शून्य कारवाही

सुवर्ण भारत:खेमचंद नेरकर

तालुका प्रतिनीधी, वरोरा

वरोरा :शहरातील यात्रा वाढ परिसरात चिकन मार्केट, मटन मार्केट मच्छी मार्केट असून मटन मार्केट आणि मच्छी मार्केट साठी इमारत बांधकाम करण्यात आले आहे. परंतु रहदारीच्या रस्त्यावरच मास विक्री होत असल्यामुळे नागरिकांना दुर्गंधीशी सामना करावा लागत आहे. रस्त्यावर मास विक्री करणाऱ्यांवर अजून पर्यंत नगरपरिषद प्रशासनाने कोणतीहीं कारवाई केलेली दिसून येत नाही. रस्त्यावर होत असलेली मांस विक्री त्वरित बंद करून बांधकाम केलेल्या इमारतीत स्थलांतरित करावे अशी मागणी नागरिकाकडून होत आहे.

राष्ट्रीय मत्स्यकी विकास मंडळ व महाराष्ट्र शासन पुरस्कृत प्राप्त निधी अंतर्गत वरोरा येथे एक करोड 18 लाख 51 हजार अत्याधुनिक मासे विक्री बाजारपेठेचे बांधकाम . करण्यात आले. सन 2018 ला या इमारतीचे लोकार्पण नामदार हंसराज अहिर व नामदार सुधीर मुनगंटीवार यांचे हस्ते पार पडले. करोड रुपये खर्च करून बांधकाम करण्यात आलेल्या इमारतीत मत्स्य विक्री होत नसून यात्रा वार्डातील रहदारीच्या रस्त्यावरच मत्स्य विक्री बाजारपेठ भरतात. त्यामुळे या परिसरात सर्वत्र दुर्गंधी पसरून रोगराईला निमंत्रण दिल्या जात आहे. तसेच मटन मार्केट साठी ही सुद्धा इमारत बांधकाम झाले असून काही लोक मास विक्री रस्त्यावरच करताना दिसून येत आहे. नगरपरिषद प्रशासनाने वेळोवेळी मास विक्री करणाऱ्या व्यवसायिकांना बांधकाम झालेल्या इमारतीतच आपली मास विक्री करावी अशा सूचना दिल्या होत्या असे समजते परंतु सूचनांचे पालन केल्या जात नाही. नगर परिषद चे अभियंता पूनवटकर यांची प्रतिक्रिया घेतली असता रस्त्यावर मास विक्री करणाऱ्या व्यवसायिकाना इमारतीत मास विक्री करा परंतु ते ऐकण्याचे मनःस्थितीत नाही. असे त्यांचेकडून सांगण्यात आले.

. नगरपरिषद प्रशासनाने रस्त्यावर मास विक्री करणाऱ्या व्यवसायिकावर कडक कार्यवाही करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.