Home Breaking News Ballarpur taluka@ news • बल्लारपूर दिवाणी व फौजदारी न्यायालय येथे जागतिक योग...

Ballarpur taluka@ news • बल्लारपूर दिवाणी व फौजदारी न्यायालय येथे जागतिक योग दिवस साजरा

275

Ballarpur taluka@ news
• बल्लारपूर दिवाणी व फौजदारी न्यायालय येथे जागतिक योग दिवस साजरा

बल्लारपूर : जागतिक योग दिवस चे औचित्य साधून आज २१ जून २०२४ रोजी दिवाणी व फौजदारी न्यायालय येथे जागतिक योग दिवस साजरा करण्यात आले.

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण चंद्रपूर यांचे निर्देशान्वये जागतिक योग दिवस तालुका विधी सेवा समिती बल्लारपुर, तालुका विधिज्ञ संघ बल्लारपुर यांचे संयुक्त विद्यमाने २१ जुन २०२४ वेळ सकाळी ९:३० वाजता दिवाणी व फौजदारी न्यायालय बल्लारपुर येथे आयोजन करण्यांत आले.

सदर कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून एस.एन. सावळेश्वरकर, दिवाणी न्यायाधीश क. स्तर तथा अध्यक्ष तालुका विधी सेवा समिती, बल्लारपुर व अनुपम एस. शर्मा सह दिवाणी न्यायाधीश क.

स्तर बल्लारपुर तसेच बल्लारपुर तालुका वकील संघाचे अध्यक्ष अँड आय.आर. सय्यद व अधिवक्ता वृंद सोबत न्यायालयीन कर्मचारी कार्यक्रमात उपस्थित होते. योग शिक्षक ऋषिपाल गहलोत, भारत स्वाभिमान पतंजलि योग समिती, बल्लारपुर यांचे मार्गदर्शनाखाली उपस्थित सर्वांना योग व त्यांचे फायदेबाबत माहिती दिली.

सदर कार्यकमामध्ये मार्गदर्शक योगशिक्षक यांचे सहकारी किरण दुधे, गंगाबाई मल्लोजवार, शिल्पा रावत, विजेता आय व प्रिती पारधी प्रामुख्याने उपस्थित होत्या. तसेच ॲड. सुनिल पुरी, ॲड. विकास गेडाम, ॲड. रणंजय सिंह, ॲड. संदेश हस्ते, ॲड. बालाजी विधाते तसेच कार्यालयीन कर्मचारी ए.ए. बोडखे स.अ., रा.वि.कान्हेरे, क.लि., मनोज बगडे क.लि., वाय.पी. चिंतलवार व. लि. यांनी मोलाचा सहभाग दिले.