Home Breaking News सेवानिवृत्त महसूल कर्मचारी डि.एस.सज्जनवार यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने दुःखद निधन

सेवानिवृत्त महसूल कर्मचारी डि.एस.सज्जनवार यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने दुःखद निधन

146

सेवानिवृत्त महसूल कर्मचारी डि.एस.सज्जनवार यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने दुःखद निधन

सुवर्ण भारत: प्रतिनिधि, चंद्रपूर

चंद्रपूर येथील मुळ रहिवाशी असणारे डि.एस.सज्जनवार यांचे काल शुक्रवार दि.२१जूनला हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने दुःखद निधन झाले.चंद्रपूर जिल्ह्यातील त्यांनी चंद्रपूर,वरोरा व चिमूर येथे महसूल विभागात काम करुन ते सेवानिवृत्त झाले होते.सध्या सज्जनवार हे राज्य महसूल कर्मचारी पत संस्थेचे काम बघत होते.त्यांच्या आकस्मिक जाण्याने सज्जनवार परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील राज्य महसूल कर्मचारी संघटनेचे जेष्ठ पदाधिकारी राजू धांडे,शैलेश धात्रक, नितीन पाटील,अमोल आखाडे, दिपक वडुळे, गजानन उपरे,सुनिल चांदेवार, सेवानिवृत्त नायब तहसिलदार पुरुषोत्तम कोमलवार, दिपक खटी सेवानिवृत्त मंडळ अधिकारी राजेंद्र पचारे ,पटवारी संघटनेचे सुनिल रामटेके, आदिंनी या दिवंगत मित्रास आपली भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित केली आहे.