Home Breaking News Vorara city @news •आनंदवनमध्ये महिलेची हत्या आरोपीचे शोधात पोलीस •डॉग...

Vorara city @news •आनंदवनमध्ये महिलेची हत्या आरोपीचे शोधात पोलीस •डॉग स्कॉट ला केले पाचारण

265

Vorara city @news

•आनंदवनमध्ये महिलेची हत्या आरोपीचे शोधात पोलीस

•डॉग स्कॉट ला केले पाचारण

सुवर्ण भारत:खेमचंद नेरकर
तालुका प्रतिनीधी, वरोरा

वरोरा :आईवडील बाहेरगावी गेले असताना विवाहित महिला आपल्या वडिलांचे घरी एकटी होती. परंतु तिचा अज्ञात आरोपीने शस्त्राने मानेवर वार करून खून केल्याची घटना 26 जून 2024 घडली. सदर मृतक महिलेचे नाव आरती दिगंबर चंद्रवंशी वय 24 आहे.
मृतक आरती हिचा विवाह दोन वर्षांपूर्वी झाला होता. परंतु काही दिवसापासून ती आपल्या आई -वडिलांकडे राहत होती. घटनेचे दिवशी 26जून ला महिलेचे वडील आपल्या पत्नीसोबत सेवाग्राम ला दवाखान्यात गेले होते. जेव्हा रात्री आई -वडील घरी पोहचले तेव्हा मुलीचे शव बाथरूममध्ये दिसलें. मृतक महिलेच्या गळ्यावर शस्त्राचे वार दिसून आले घटनास्थळी रक्त साचलेले होते. पोलीस विभागाला रात्रौ 8.30 वाजता घटनेबाबत माहिती कळविण्यात आली .लागलीच पोलीस उपविभागीय अधिकारी नयोमी साटम आणि पोलीस निरीक्षक अमोल काचोरे घटनास्थळावर दाखल झाले.घटनेची पुढील चौकशी सुरु केली. 27 जून 2024 ला जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन घटनास्थळावर दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाचे निरीक्षण करून मृतक महिलेच्या वडिलांची विचारपूस करून मृतक महिले बाबत माहिती घेतली. डॉग स्कॉटला पाचारण करण्यात आले आहे.नेमकी घटना कशी घडली, कोणत्या कारणावरून खून करण्यात आला याबाबत पोलिसांनी तपासाची चक्र फिरविली आहे.आनंदवन हे सुजाण नागरिकांचे माहेरघर असून याठिकाणी प्रत्येक व्यक्ती आपल्या समाजकार्याचे कामात व्यस्त असतात. आनंदवनातील खुणाची ही पहिली घटना आहे.

घटनेची माहिती मिळताच वरोरा पोलीस चौकशी करीत आहे