Home Breaking News Varora city @news • नगरपरिषदेच्या नाकारतेपणामुळे वरोरा शहरात चार वर्षीय बालकांचा...

Varora city @news • नगरपरिषदेच्या नाकारतेपणामुळे वरोरा शहरात चार वर्षीय बालकांचा मृत्यू. • मनसे जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत जुंजारे यांनी केली कार्यवाहीची मागणी

29

Varora city @news

• नगरपरिषदेच्या नाकारतेपणामुळे वरोरा शहरात चार वर्षीय बालकांचा मृत्यू.

• मनसे जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत जुंजारे यांनी केली कार्यवाहीची मागणी

सुवर्ण भारत:खेमचंद नेरकर
तालुका प्रतिनीधी, वरोरा

वरोरा शहरात पाण्याची सुरुवात होते ना होते समस्या समोर येऊ लागतात लागलीच एक दिवस अगोदर मालवीय वार्डातील चार वर्षे बालकाचा डायरियामुळे मृत्यू झाला वरोरा शहरात डेंगू मलेरिया साथीचे कितीतरी रुग्ण हॉस्पिटलमध्ये भरती आहेत पण प्रशासनाच त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष आहे वरोरा शहरात पावसाचे दिवस चालू होताच अनेक समस्या समोर येऊ लागतात पण शहरात कधी फवारणी होत नाही कधी साफसफाई होत नाही जिकडे तिकडे घाणीचे साम्राज्य आहे जिकडे तिकडे रस्त्यावर गुरांचा वावर चालू आहे आणि याकडे नगरपालिका प्रशासक आणि प्रशासन सगळे डोळे मिटून पाहत आहे जनतेच्या आरोग्याची यांना काळजीच नाही. लागलीच 6 जुलै रोजी मालवीय वार्डातील एक चार वर्षीय बालक पूर्वेश सुभाष वाढरे दूषित पाण्यामुळे त्याला डायरिया होऊन तो मृत्युमुखी पडला आसपासच्या जनतेने वारंवार नगरपालिकेला या समस्या बाबत प्रशासनाला माहिती दिली तरीही बेजवाबदार अधिकाऱ्यांनी यावर कोणतीही कार्यवाही केली नाही ज्यामुळे निरपरात बालकाला आपला जीव गमवावा लागला तर काही हॉस्पिटलमध्ये भरती आहेत. याकरिता नगरपालिका प्रशासक जलपूर्ती अधिकारी सफाई विभाग कर्मचारी सगळे दोषी आहेत या सर्वांवर सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी व मृतकाच्या परिवाराला आर्थिक मदत देण्यात यावी. असे मत मनसे जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत जुंजारे यांनी व्यक्त केले.
वरोरा नगरपरिषद अंतर्गत अनेक समस्या तोंड उघडून उभ्या आहेत पण जनतेच्या या कोणत्याही समस्या कडे नगरपालिका प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष आहे उदाहरणार्थ दोन वर्षांपूर्वी चिरगर लेआउट मध्ये 30 ते 40 लोकांना पिलिया झाला होता त्यानंतर नगरपरिषदेला जाग आली आणि त्यासाठी काहीतरी दिखावा करण्याच्या निमित्त नगरपरिषद ने कार्यवाही सुरू केली नगरपरिषद पूर्णपणे भ्रष्टाचाराने व्यापली आहे नगरपरिषद जनतेच्या सहनशीलतेची परीक्षा घेत आहे अनेक प्रचार माध्यमातून नगरपरिषदेचे लक्ष शहराच्या समस्या कडे जावे या करिता प्रयत्न करत आहे शहरात मलेरिया डेंगू चा फैलाव सुरू झाला ज्यामुळे चार वर्षाच्या बालकांला जीव गमावावा लागला त्या बालकाच्या मृत्यूची चौकशी करून सर्व संबंधित प्रशासकीय अधिकारी यांची चौकशी करून त्यांच्यावर सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करण्यात यावा व त्यांना निलंबित करण्यात यावे असे निवेदन मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत जुंजारे यांनी दिले कार्यवाही न झाल्यास मनसे स्टाईलने आंदोलन करू असे निवेदन वरोरा पोलीस निरीक्षक यांना देण्यात आले
निवेदन देतेवेळी मनसे जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत जुंजारे. मालवीय वार्डनिवासी राहुल देवडे. युवा नेता शशिकांत डफ, आलोक जाधव, त्रिशूल घाटे, आनंद गेडाम, आकाश काकडे, अक्षय मेश्राम,अक्षय डाहुले,गजू पेंदोर,स्वप्निल टोंगे,प्रणय सोनटक्के, यश चांदेकर, सुरज भोयर आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री, राज्य
नगर विकास मंत्री निवेदन
पाठविण्यात आल्या.