Mul taluka@ news
•माहिती अधिकार, पोलिस मित्र व पत्रकार सेनाच्या वतीने शालेय साहित्य वितरण!
सुवर्ण भारत:किरण घाटे (उपसंपादक)
मूल -:माहिती अधिकार, पोलिस मित्र व पत्रकार संरक्षण सेना तालुका मूलच्या वतीने जिल्हा परिषद शाळा दाबगांव व उच्च प्राथमिक शाळा सुशी येथील विद्यार्थांना शालेय साहित्याचे वितरण करण्यात आले.शालेय साहित्य मिळाल्याने विद्यार्थ्यांचे चेहऱ्यावर आनंद दिसून आला.या वेळी डॉ .आनंदराव कुळे यांनी सदरहू संघटना राबवित असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली.तसेच विद्यार्थ्यांनी वाटप केलेल्या शालेय साहित्यांचा योग्य वापर करा ! शिका व जीवनात मोठे व्हा! असा सल्ला विद्यार्थ्यांना दिला.याप्रसंगी आडे ,परचाके कुमरे बांबोळे, प्रवीण भरटकर,प्रवीण गोहणे ,संजय चिटमलवार, सपना गेडाम , सुषमा भुरसे ,संगीता बुरांडे ,भगत बांबोले व विद्यार्थ्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
