Home Breaking News Varora city @news •चार वर्षीय बालकाच्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्यावर कठोर कारवाई...

Varora city @news •चार वर्षीय बालकाच्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्यावर कठोर कारवाई करा •मालवीय वॉर्डवासियांची मागणी • सामाजिक कार्यकर्त्यांनी न. प.मुख्याधिकाऱ्याना दिले निवेदन

43

Varora city @news

•चार वर्षीय बालकाच्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्यावर कठोर कारवाई करा
•मालवीय वॉर्डवासियांची मागणी
• सामाजिक कार्यकर्त्यांनी न. प.मुख्याधिकाऱ्याना दिले निवेदन

सुवर्ण भारत: खेमचंद नेरकर

वरोरा:शहरातील मालवीय प्रभागातील नळाचे व्हालमधून नालीचे पाणी गेले ते पाणी नागरिकांनी पिल्यामुळे अनेकांना अतिसाराची लागण झाली. अतिसार ची लागण ही मृत्यू पावलेल्या चार वर्षीय बालकाला झाली होती.आणि त्यात बालका चा मृत्यू झाला आहे.बालकाच्या मृत्यूस जबाबदार कर्मचाऱ्यावर कठोर कार्यवाही करण्यात यावी. अशी मागणी मालवीय प्रभागातील सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी न. प.मुख्याधिकारी यांना8, जुलै 2024 ला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
मालवीय प्रभागात काटेरी झुडपे वाढलेली असून स्ट्रीट लाईट नेहमी बंद असते. तसेच स्वछता राहत नाही त्यामुळे पावसाळ्यात सरपटणाऱ्या प्राण्यांचा नागरिकांना धोका निर्माण झाला आहे.नाल्या साफ होत नाही, असेही करून नाल्या साफ केल्या तर गाळ दिवसेंदिवस तसाच साचून राहतो.अशा अनेक समस्या मालवीय प्रभागातील नागरिकांना भेडसावीत असून समस्यांचे निवारण त्वरित झाले नाही तर नागरिकांचा मोर्चा नगरपरिषद वर धडकेल, काही विपरीत घडल्यास याची सर्वस्वी जबाबदारी नगरपरिषद प्रशासनाची राहील असा इशारा सुद्धा नागरिकांनी दिला आहे.मुख्याधिकारी गजानन भोयर यांना निवेदन देताना शिष्ट मंडळात सामाजिक कार्यकर्ते लखन केशवानी बंडू लभाने, महेश पवार अमित घोडमारे प्रणय खातरकर किसन कळसकर, श्रेयश कुमरे,अनिकेत मंजुळकर, संजय पेंदोर, तनवीर शेख प्रफुल वनकर पंकज यादव यांचा समावेश होता.