⬜♦️झोंबतो हा गार वारा ❗
____________________________
येई गुलाबी थंडीत रोमरोमांतुनी शहारा
झोंबतो मज तुझ्या प्रितीचा हा गार वारा
//१//
दरवळे सुगंध नसांत जाई अन जुईचा
पडला मोहक सडा पारिजातकाचा
//२//
घेऊन येई थैला तुझ्या आठवणींचा
छेडे मज हा वारा आपुल्या साठवणींचा
//३//
धुंद वारा हा बेधुंद मनास करी
झोंबे तनास अन थरकाप सोडे उरी
//४//
घेई भरारी उंच गगनात मनाचा पारवा
उगीचं शोधे मे क्षितिजातं रातीच्या चांदवा
//५//
मंद मंद स्मित ओठी हे फुटे
झुळूक गारव्याची लागताच शांत चित्तास वाटे
//६//
झोंबत्या वाऱ्यासह होई रे तुझा भास
*भास-भासाच्या खेळात वाढे माझा श्वास
//७//
🟥🏵️मुक्ता आगडे pk🏵️🟫
⬜⬜चंद्रपूर ( मूल )__⬜⬜
