Home Breaking News Beed dist @news • आष्टी येथील माजी आमदार भीमराव धोंडे यांच्या...

Beed dist @news • आष्टी येथील माजी आमदार भीमराव धोंडे यांच्या संपर्क कार्यालयात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या ऑनलाईन फॉर्म भरण्यास उत्स्फूर्त प्रतिसाद —-

69

Beed dist @news

• आष्टी येथील माजी आमदार भीमराव धोंडे यांच्या संपर्क कार्यालयात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या ऑनलाईन फॉर्म भरण्यास उत्स्फूर्त प्रतिसाद —-

सुवर्ण भारत : गोरख मोरे
बीड जिल्हा प्रतिनिधी

आष्टी येथील माजी आमदार भीमराव धोंडे यांनी सुरू केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेच्या मोफत ऑनलाइन फॉर्म भरण्याच्या प्रक्रियेस महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे .
महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केल्याने सर्वत्र महिलांची फॉर्म भरण्यासाठी गर्दी झाल्याने , अनेक ठिकाणी आर्थिक पिळवणूक झाल्याने माजी आ. भीमराव धोंडे यांच्यावतीने आष्टी येथे सर्व महिलांचे लाडकी बहीण योजनेचे ऑनलाईन अर्ज मोफत भरण्याची सुविधा उपलब्ध केली .
महाराष्ट्र शासन राज्यातील गोरगरीब जनतेसाठी विविध योजना राबवत असून , शासनाने जनहिताचे अनेक निर्णय घेतले असून , यामध्ये शेतकरी /महिलांसाठी वेगवेगळ्या योजना आणल्या असून , महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना आणली असून , यामध्ये ज्या महिला पात्र ठरतील अशांना पंधराशे रुपये महिना देण्यात येणार असून , या योजनेचा लाभ घेण्याकरिता ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी महिलांची गर्दी झाल्या मुळे माजी आमदार भीमराव धोंडे यांच्या वतीने आष्टी येथे स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित करुन महिलांना मोफत सेवा पुरवली असून , परिसरातील महिला सर्व कागदपत्र जमा करून आष्टी येथील माजी आमदार भीमराव धोंडे यांच्या किनारा चौकातील संपर्क कार्यालयात येऊन आपापले फॉर्म मोफत ऑनलाईन भरुन घेतले असून , आतापर्यंत शेकडो महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे .
याबाबत अधिक माहिती करिता , माजी आमदार भीमराव धोंडे यांचे स्वीय सहाय्यक दादा जगताप , जफर शेख , हौसराव एकशिंगे , राहुल निकाळजे यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे .