Home Breaking News Padoli @ श्री.सुधीरभाऊ मुनगंटीवार जनसेवा केंद्रात लाडकी बहीण योजनेचा ऑफलाईन ऑनलाईन फॉर्म...

Padoli @ श्री.सुधीरभाऊ मुनगंटीवार जनसेवा केंद्रात लाडकी बहीण योजनेचा ऑफलाईन ऑनलाईन फॉर्म भरण्याचा शुभारंभ

134

Padoli @ श्री.सुधीरभाऊ मुनगंटीवार जनसेवा केंद्रात लाडकी बहीण योजनेचा ऑफलाईन ऑनलाईन फॉर्म भरण्याचा शुभारंभ

सुवर्ण भारत: शंकर महाकाली (संपादक)

चंद्रपूर:महाराष्ट्र राज्यातील महायुती सरकारने महिलासाठी लाडकी बहीण योजना सुरू केली असून त्या योजनेच्या माध्यमातून 21 ते 65 वर्षाच्या महिलांना दरमहा पंधराशे रुपये मिळणार आहे.या योजनेसाठी महिलांना ऑनलाईन ऑफलाईन अर्ज 31 ऑगस्ट पर्यंत भरणे अनिवार्य आहे.आज पडोली फाटा येथील श्री.सुधीरभाऊ मुनगंटीवार जनसेवा केंद्राच्या माध्यमातून ऑनलाईन ऑफलाइन अर्ज भरण्याचा शुभारंभ या योजनेत पात्र होणाऱ्या महिलेकडून रिबीन काटून तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या फोटोला हार टाकून झाले.

यावेळी अनिल डोंगरे प्रदेश उपाध्यक्ष भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र विनोद खडसे तालुका सचिव भाजपा,आशिष वाढई,रमेश बूच्छे,उज्वला नलगे,रंजना धुमने,प्रतिभा काळे,बागेश्वर रामटेक,राजेश कुबेर, प्रविण मुडपावर यांची प्रमुख उपस्थिती होती