Home Breaking News Varora city @news • आनंद माध्यमिक विद्यालय, आनंदवन मध्ये शालेय मंत्रिमंडळ गठीत

Varora city @news • आनंद माध्यमिक विद्यालय, आनंदवन मध्ये शालेय मंत्रिमंडळ गठीत

111

Varora city @news

• आनंद माध्यमिक विद्यालय, आनंदवन मध्ये शालेय मंत्रिमंडळ गठीत

सुवर्ण भारत: खेमचंद नेरकर
तालुका प्रतिनिधी, वरोरा

शाळेमध्ये आरोग्य, क्रीडा, शिक्षण, सहल, पर्यावरण व स्वच्छता, सांस्कृतिक ह्या महत्वाच्या विभागाची कामे शाळेशी आणि किंबुहुना विद्यार्थ्यांशी निगडित असतात.आणि सर्व खातेनिहाय जबाबदारी विद्यार्थ्यांकडे सोपविली जातात. यासाठी लोकशाही पद्धतीने मतदान प्रक्रिया पार पाडून शालेय मंत्री मंडळ 13 जुलै 2024 रोज शनिवार ला गठीत करण्यात आले.

. शालेय मंत्रिमंडळ निवडणुकीत
मुख्यमंत्री पदासाठी वर्ग नववीचा विद्यार्थी कु. निकुंज हेमने यांना सर्वात जास्त मते पडली त्यामुळे त्याची मुख्यमंत्रिपदी वर्णी लागली. शाळेच्या मुख्याध्यापिका सन्माननीय कु. विद्या गोखरे यांनी त्याचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले आणि पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.सोबतच सर्व शिक्षक वृंदानी शब्दशा त्याचे अभिनंदन केले.आणि शालेय मंत्रिमंडळात कु.निकुंज हेमने कडे मुख्यमंत्री पदाची सूत्रे सोपविण्यात आली.
शालेय मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री कु. प्रत्युक्षा पवार,गृहमंत्री हिमांशू वाढई,
क्रीडा मंत्री कु. निशा चव्हाण,आरोग्य मंत्री कु.गार्गी भोयर,शिक्षणमंत्री कु.पूनम ठाकरे,सांस्कृतिक मंत्री कु.तक्षशीला गायकवाड,पर्यावरण व. स्वच्छता मंत्री कु.वैष्णवी झीलपे,सहलमंत्री शिवम बावणे,ह्या विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणुन सहा. शिक्षक प्रदीप कोहपरे यांनी काम पाहिले.विद्यार्थीनी वैष्णवी झीलपे, निशा चव्हाण यांनी निवडणूक प्रक्रियेचे काम यशस्वीपणे सांभाळले.
सहा. शिक्षक आशिष येटे सरांनी
शालेय मंत्री मंडळाची निवडणूक लोकशाही पद्धतीने घेण्यासाठी प्रक्रियेबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सहा. शिक्षक हर्षल चौधरी यांनी निवडणुकीत कोणताही गैरप्रकार होऊ नये याची दक्षता त्यांनी घेतली.सहा. शिक्षिका स्मिता काळे, आणि संचिता निबूद्धे मॅडम यांनी निवडणूक केंद्रावर विद्यार्थी कोणत्याही उमेदवाराचा प्रचार करून आमिष दाखवून मते आकर्षित करणार नाही याबाबत निरीक्षकांची प्रमुख जबाबदारी सांभाळली. तसेच शाळेचे लिपिक प्रकाश नाकाडे यांनी निवडणूक
शांततेत पार पाडण्यासाठी सहकार्य केले.