Home Breaking News Ghugus City@ news • विठ्ठलाच्या भक्तीने दुमदुमले घुग्घुस शहर

Ghugus City@ news • विठ्ठलाच्या भक्तीने दुमदुमले घुग्घुस शहर

280

Ghugus City@ news
• विठ्ठलाच्या भक्तीने दुमदुमले घुग्घुस शहर

सुवर्ण भारत:पंकज रामटेके
सहाय्यक जिल्हा प्रतिनीधी, चंद्रपूर

घुग्घुस : येथील जनाबाई निमकर यांच्या घरापासून आणि समस्त तेली समाज बहुउद्देशीय संस्था व समस्त घुग्घुस शहरवासीयांतर्फे विठ्ठल मंदिर देवस्थानापासून आषाढी एकादशीनिमित्त बुधवार, १७ जुलै रोजी सकाळी विठ्ठल रुक्मिणीच्या पालखीची मिरवणूक काढण्यात आली.

याप्रसंगी भाजपा जिल्हा महामंत्री विवेक बोढे यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीच्या पालखीची पुजा करण्यात आली. भजन, हरीनामाच्या गजराने घुग्घुस शहर दुमदुमून गेले.

विठ्ठल मंदिरात पुजा करून पालखीची मिरवणूक गांधी चौक, आठवडी बाजार, पोलीस स्टेशन, छत्रपती शिवाजी महाराज चौक, शेणगाव फाटा, पांढरकवडा मार्गे वढा येथील विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात समाप्त करण्यात आली.

जनाबाई निमकर यांच्या तर्फे मागील ५ वर्षांपासून मिरवणूक काढण्यात येत आहे तर समस्त तेली समाज बहुउद्देशीय संस्थेतर्फे मागील ३ वर्षापासून मिरवणूक काढण्यात येत आहे.

यावेळी भाजपा जिल्हा महामंत्री विवेक बोढे, समस्त तेली समाज बहुउद्देशीय संस्थेचे सोनल भरडकर, आशीष मासीरकर,साजन गोहणे,जनाबाई निमकर,चिन्नाजी नलभोगा, हेमराज बोंमले, विठोबा झाडे, सखुबाई बोबडे, माया मांडवकर, संध्या जगताप,किरण बोढे, नितु चौधरी, वैशाली ढवस, प्रेमलाल पारधी, गणेश झाडे, दिगांबर होकम, अनिल बाम, रुकेश समर्थ,अंकेश मडावी आदींची उपस्थिती होती.