Home Breaking News Beed dist @news • आष्टी तालुक्यातील कडा येथे माजी आमदार भीमराव...

Beed dist @news • आष्टी तालुक्यातील कडा येथे माजी आमदार भीमराव धोंडे यांच्या जनसंपर्क अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद — • शेतकऱ्यांच्या आर्थिक फायद्यासाठी बाजार समितीने वजनावर बोकड विक्रीची सोय करावी— माजी आमदार भीमराव धोंडे

86

Beed dist @news

• आष्टी तालुक्यातील कडा येथे माजी आमदार भीमराव धोंडे यांच्या जनसंपर्क अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद —

• शेतकऱ्यांच्या आर्थिक फायद्यासाठी बाजार समितीने वजनावर बोकड विक्रीची सोय करावी— माजी आमदार भीमराव धोंडे

सुवर्ण भारत : गोरख मोरे
बीड जिल्हा प्रतिनिधी

अलिकडच्या काळात शेतकरी शेतीला जोडव्यवसाय म्हणून शेळी /बोकड पालनाकडे वळला असून , शेतकऱ्यांना याचा चांगला आर्थिक फायदा व्हावा म्हणून कडा कृषी उत्पन्न बाजार समितीने शेळी /बोकड वजनावर विक्रीची सुविधा करण्यासाठी प्रयत्न करावेत. कडा येथील दुध संघ, बाजार समिती या दोन्ही संस्था मी विधानसभा सदस्य असताना सुरू असून , कांदा मार्केट मुळे कड्याच्या नाव लौकिकात भर पडली असल्याचे माजी आमदार भीमराव धोंडे यांनी कडा ययेथील जनसंपर्क अभियान प़सगी प़तिपादन केले . कडा येथील जनसंपर्क अभियानास ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला .
अभियाना दरम्यान कडा कृषी उत्पन्न बाजार समितीला भेट दिली . सभापती रमजान तांबोळी, उपसभापती नामदेव धोंडे यांनी माजी आमदार भीमराव धोंडे व युवानेते अजयदादा धोंडे यांचे स्वागत केले . याप्रसंगी संचालक संजय मेहेर, संदीप नागरगोजे, योगेश भंडारी, माजी सभापती संजय ढोबळे, माजी सरपंच अनिल ढोबळे, राम मधुरकर, आण्णासाहेब लांबडे आदी जन उपस्थित होते . यावेळी रमजान तांबोळी व अनिल ढोबळे यांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या . विविध ठिकाणी बोलताना भिमराव धोंडे यांनी सांगितले की,कडा हे गाव तालुक्याचा केंद्रबिंदू असुन , अद्याप कडा पाणीप्रश्न सुटलेला नाही . कडा बसस्थानकाचा प्रश्न प्रलंबित असून , मी आमदार असताना रुरबन योजनेतुन कडा गावांसाठी आठ कोटी दिले . तालुक्यात उत्पादीत झालेला शेतकऱ्यांचा माल बाहेर जाता कामा नये यासाठी बाजार समितीने प्रयत्न करावे , कांदा मार्केट बद्द्ल मला अभिमान वाटत असल्याचे या प्रसंगी सांगितले .

आष्टी /पाटोदा /शिरूर विधानसभा मतदारसंघातील सर्व सामान्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी माजी आ. भीमराव धोंडे यांनी शुक्रवारी दिनांक १९ जुलै रोजी जनसंपर्क अभियाना अंतर्गत कडा शहरात/वाड्या वस्त्यावर / बाजारपेठेत फिरून लोकांच्या भेटी घेऊन व वृद्धांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या असून , मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना व लाडका भाऊ योजनेचा संबंधितांनी लाभ घेण्याचे आवाहन केले असून , जनसंपर्क अभियान दौऱ्याच्या निमित्ताने माजी आ. भीमराव धोंडे यांचे ठिकठिकाणी वाजतगाजत व तोफा वाजवुन स्वागत करण्यात आले .
गेल्या आठवड्यात आष्टी / पाटोदा नगरपंचायत अंतर्गत शहरात फिरून ग्रामस्थांशी संवाद साधला . शुक्रवारी कडा येथील तळेवस्ती, जामले वस्ती, सुंदर नगर , जाधव गल्ली, शिरोळे गल्ली, नगर रोडवरील कर्डीले आणि सांगळे वस्ती तसेच मेहेत्रे वस्ती व खेडकर वस्तीवर व बाजारपेठेत जाऊन नागरीकांसोबत चर्चा करुन समस्या जाणून घेतल्या असून , चातुर्मास निमित्ताने कडा येथील जैन स्थानकात प.पू. विश्वदर्शनाजी महाराज, प. पू. कीर्तीसुधाजी महाराज यांची भेट घेऊन आशिर्वाद घेतले . अभियाना दरम्यान माजी सरपंच श्रीरंगराव कर्डिले , माजी उपसभापती दिपक कर्डिले , माजी उपसरपंच बाळासाहेब कर्डिले , बाजार समितीचे माजी संचालक उद्धव कर्डीले , बळीराम कर्डिले , चेअरमन नागेश कर्डिले, पं. स. माजी सदस्य बप्पासाहेब पाटील , शिक्षक नेते एस आर पाटील, माजी ग्रा.पं. सदस्य सुनिल मेहेत्रे, मल्हारी जामले, काकासाहेब करांडे, हनुमंत करांडे, दत्तु कर्डीले, मोहन कर्डिले, विष्णूपंत कर्डिले, हरिश्चंद्र सांगळे, युवा उद्योजक शेखर कर्डीले यांच्या छत्रपती इंडस्ट्रीज,शामभाऊ भोजने, भिमराव कर्डीले,कुरणातील शहादेव खेडकर, महावीर कृषी सेवा केंद्र,प्रा. जमिर सय्यद,अभय मेहेर , विष्णूपंत कराळे, संजय शंकर कर्डिले, माजी चेअरमन बंडु शिंदे, दिपक बोराडे,शिवम सांगळे ग्राफीक्स, ग्रा.पं. सदस्य बाळासाहेब देशमुख,ग्रा प सदस्य बिपिन भंडारी, चंद्रकांत ससाणे,अमोल देशमुख, विष्णू दळवी,झेड. के‌. भंडारी असलम पानसरे, किशोर भंडारी, मयूर भंडारी,राजु भंडारी, सुरज भंडारी, कौशल्या भाभी चोरडिया,कालिका भांडी भांडार, बबन शास्त्री,प्रकाश वेदपाठक,नसिरभाई शेख यांच्या निवासस्थानी भेटी दिल्या असून , शिक्षक नेते अंबादास कर्डिले यांच्या मातोश्रीचे आणि बाबा कर्डीले नुकतेच निधन झाले त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यात आले .
याप्रसंगी भाजपाचे युवा नेते अजयदादा धोंडे , अभयराजे धोंडे , ग्रा. पं. सदस्य बाळासाहेब देशमुख, लिंबराज कर्डीले, रज्जाक भाई, शंकरराव देशमुख , बजरंग कर्डीले, मोहन कर्डीले, रिपाईचे तालुकाध्यक्ष अशोक साळवे , सोनाजी गांजुरे आदी जन उपस्थित होते . ठिकठिकाणी झालेल्या छोटेखानी कार्यक्रमास कैलास कर्डिले,विष्णू कर्डिले, बबनराव कोठे,ग्रा. पं. सदस्य रघुनाथ कर्डीले, बन्सी कर्डीले, गजानन सांगळे, डी. के. कर्डीले, माजी सदस्य राम कर्डिले, सुभाष कर्डिले, सरपंच माऊली वाघ, आजिनाथ जामले, दिपक बोराडे, संतोष ओव्हाळ, बापुराव ढोबळे, काकासाहेब कर्डिले, भिमराव कर्डिले,दिलीप मेहेत्रे, बाळासाहेब मेहेत्रे दत्तु कदम, प्राचार्य डॉ. हरिदास विधाते, चेअरमन शाम सांगळे, पांडुरंग कर्डिले, प्रा. विनोद ढोबळे, प्रा. मुश्ताक शेख, माजी सभापती गौतम सावंत, बंडू मेहेत्रे, कुंडलीक मेहेत्रे , सुनिल मेहेत्रे आदीची उपस्थिती होती . कडा बाजार पेठेत व्यापाऱ्यांनी माजी आमदार भीमराव धोंडे यांचे ठिकठिकाणी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन स्वागत केले.