Home Breaking News Beed dist @news • आ.नमिता मुंदडांचा पाठपुरावा– •४१ किलोमीटरच्या रस्तेकामांसाठी...

Beed dist @news • आ.नमिता मुंदडांचा पाठपुरावा– •४१ किलोमीटरच्या रस्तेकामांसाठी ५० कोटींचा निधी मंजूर—

88

Beed dist @news

• आ.नमिता मुंदडांचा पाठपुरावा–

•४१ किलोमीटरच्या रस्तेकामांसाठी ५० कोटींचा निधी मंजूर—

सुवर्ण भारत : गोरख मोरे
बीड जिल्हा प्रतिनिधी

आ.मुंदडा यांच्या प्रयत्नांमुळे मतदारसंघातील राज्य शासनाने या रस्त्यांच्या कामासाठी जवळपास ५० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून , या निधीतून सिमेंट कॉंक्रीटचे रस्ते करण्यात येणार आहेत .
आ. नमिता मुंदडा यांनी हा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , उपमुख्यमंत्री अजित पवार , ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन , लोकनेत्या आ. पंकजाताई मुंडे , भाजप नेत्या प्रीतमताई मुंडे यांचे आभार मानले असून ,
या रस्त्यांची दर्जोन्नतीसह होणार कामे पुढील प्रमाणे —
रा.मा. ६४ ते कानडी बदन रस्ता (२.८ किमी) – ३.८८ कोटी रु.,
रा.मा. ६४ (चिंचोलीमाळी जवळ) ते सारूकवाडी डोका हदगाव लाखा रस्ता (८.५ किमी) – १०.२८ कोटी रु.,
इजिमा ५४ (चाकरवाडी जवळ) ते दरडवाडी ढाकणवाडी नांदूरघाट रस्ता (११ किमी) – १३.२६ कोटी रु.,
प्रजिमा १८ (सोनीजवळा जवळ) ते युसुफ वडगाव भालगाव सादोळा बावची रस्ता (१३.५ किमी) – १४.५ कोटी रु.,
प्रजिमा ३९ ते काशिदवाडी रस्ता (२.८ किमी) – ३.४७ कोटी रु.,
रा.म.मा. ५४८-ड ते सनगाव (२.२ किमी) – २.५८ कोटी .