Ballarpur city @news
• विशालगड कोल्हापूर येथे झालेल्या हिंसाचार आणि अत्याचारावर तात्काळ कारवाई करा आणि पीडितांना तात्काळ आर्थिक मदत द्या.
सुवर्ण भारत: शंकर महाकाली (संपादक)
बल्लारपूर:कोल्हापुरातील विशालगड येथे १४ जुलै रोजी झालेल्या वादाचा निषेध, अतिक्रमणाच्या नावाखाली जातीय दंगली घडवून समाजाला विशेषत: मशिदी, दर्गाह घरांची तोडफोड करण्यात आली आणि विशेष सामाजिक घोषणाबाजी करण्यात आली न्यायालयीन खटला सुरू झाला असून, आजपर्यंत कोणताही निर्णय झालेला नाही. काही लोक असंवैधानिक पद्धतीने गोंधळ घालत आहेत.
बल्लारपूरच्या मुस्लिम संघटनेने तहसीलदारा मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन पटविण्यात आले
जातीवादाच्या नावाखाली मंदिरे, मशिदी, गुरुद्वारा, चर्च आणि धार्मिक स्थळांचे नुकसान करणे म्हणजे दहशतवादाला खतपाणी घालत असल्याचे नामुसे रिसालत ॲक्शन ट्रस्टचे जिल्हाध्यक्ष सय्यद अफजल अली तहफुजे यांनी म्हटले आहे.
यामागे जे काही संघटना आहेत, त्यांच्यावर कारवाई करावी व महाराष्ट्र शासनाने नुकसान भरपाई द्यावी, असे न झाल्यास संपूर्ण जिल्ह्यात जनआंदोलन करण्यात येईल, अशी विनंती करण्यात आली.
यावेळी सरफराज शेख, आसिफ शेख, आफताब पठाण, शाहिद शेख, मुकद्दर खान, मोहित, इम्तियाज भाई, अनीस, शोएब, नदीम, मुन्ना भाई, फजल, नवाब, अजहर अली, समीर, फैजान, शमसुद्दीन, अजीम फुरकान, सोहेल खान, रझा उपस्थित होते.
