Home Breaking News Wardha dist @News • राका ओ.बी.सी. सेलचे विधानसभा अध्यक्ष नितीन आष्टीकर यांच्या...

Wardha dist @News • राका ओ.बी.सी. सेलचे विधानसभा अध्यक्ष नितीन आष्टीकर यांच्या नेतृत्वात कारगिल विजय दिवसी गांधी चौकातील शहिदांना पुष्पचक अर्पण करून श्रद्धांजली अर्पण वाहिली

41

Wardha dist @News
राका ओ.बी.सी. सेलचे विधानसभा अध्यक्ष नितीन आष्टीकर यांच्या नेतृत्वात कारगिल विजय दिवसी गांधी चौकातील शहिदांना पुष्पचक अर्पण करून श्रद्धांजली अर्पण वाहिली

सुवर्ण भारत :अर्पित वाहाणे
उपजिल्हा प्रतिनिधी, वर्धा

या कार्यक्रमाचे अध्यक्ष लखन अग्रवाल कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक हे होते. कार्यक्रमाचे संचालन दर्पण टोकसे यांनी केले तर आभार वृषभ निस्ताने यांनी मानले. कार्यक्रमात श्रद्धांजली वाहताना भारत माता की जय ,वंदे मातरम ,विर जवान अमर रहे ,चे नारे लावण्यात आले.

कारगिल शिखरांवर घुशखोरांच्या वेशात आलेल्या पाकिस्तानी लष्कराला असा विश्वास होता, की भारतीय लष्कर त्यांच्यापर्यंत पोहोचणे जवळपास अशक्य आहे. ही घुसखोरी माहीत झाल्यावर भारतीय लष्कराच्या शुर जवानांनी पुढे जाऊन शत्रूच्या पराभव करण्याचा निर्णय घेतला.

3 जून रोजी भारतीय लष्कराने हा हल्ला सुरू केला व 60 दिवसापेक्षा जास्त हे युद्ध सुरू होते .या युद्धात भारतीय सेन्याचे 500 हून अधिक जवान शहीद झाले होते .अखेरच्या श्वासापर्यंत धैर्याने लढा देत भारतीय सेनानी कारगिल युद्ध जिंकलं. या कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्ते दर्पण टोकसे ,गुड्डू पठाण, प्रवीण शर्मा ,ज्ञानेश्वर राठोड, सुहास ठाकरे, गौतम कुंभारे, प्रभाकर निंबाळकर. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नितीन आष्टीकर, डॉक्टर राजपाल भगत, सविता पुरी, वृषभ निस्ताने ,महेश बिरोले, रूपचंद टोपले, शोभा कानफाडे, लता ढोकणे आधी कार्यकर्ते उपस्थित होते.