Home Breaking News Bhadrawati taluka@news •रिकंस्ट्रक्शन ऑफ दि वर्ल्ड अंतर्गत.”डॉ. बाबासाहेब आंबेडकर दिग्दर्शित बुद्ध धम्माकडे...

Bhadrawati taluka@news •रिकंस्ट्रक्शन ऑफ दि वर्ल्ड अंतर्गत.”डॉ. बाबासाहेब आंबेडकर दिग्दर्शित बुद्ध धम्माकडे वाटचाल ” •समता सैनिक दल तर्फे ‘वर्ष धम्मप्रवचन मालिका चे भव्य आयोजन

156

Bhadrawati taluka@news
•रिकंस्ट्रक्शन ऑफ दि वर्ल्ड अंतर्गत.”डॉ. बाबासाहेब आंबेडकर दिग्दर्शित बुद्ध धम्माकडे वाटचाल “
•समता सैनिक दल तर्फे ‘वर्ष धम्मप्रवचन मालिका चे भव्य आयोजन

सुवर्ण भारत:मनोज मोडक
तालुका प्रतिनिधि, भद्रावती

भद्रावती :- शहरात समता सैनिक दल, शहर व तालुका शाखा भद्रावती च्या वतिने आषाढी पौर्णिमेनिमित्ताने ‘वर्षावास धम्मप्रवचन मलिका’ चे नियमितपणे आयोजित करण्यात येत आहे. बौद्ध धर्माच्या मूलभूत विषयांवर जाणकार लोक मार्गदर्शन करणार आहेत. आषाढी पौर्णिमा, रविवार, 21 जुलै 2024 रोजी सकाळी 08:30 वाजता बुद्ध विहार, आयुध निर्माणी चांदा, भद्रावती येथे वर्षावास प्रवचन मलिकेचा उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आले असून बौद्ध धम्म संस्कृतीची ऐतिहासिक मौलिकता देशात आणि जगात रुजवण्यासाठी आणि एकरूपता आणि एकरूपता प्रस्थापित करण्यासाठी भद्रावती तालुक्यातील सर्व बौद्ध विहारा मध्ये या मालिकेचे आयोजन करण्यात येणार आहे बौद्ध विहारात ही वर्षावास धम्मप्रवचन मलिका मोफत घेतली जाणार आहे .

तारीख:- 28 जुलै 2024  वेळ:- संध्याकाळी 06:00 वाजता स्थळ:- बुद्ध विहार, कटारिया लेआउट  विषय:- दानसम्राट अनाथपिंडक या विषयावर समता सैनिक दला तर्फे या आयोजन करण्यात आले.

वर्षावास धम्मप्रवचन मालिकेमध्ये लहान मुले, वृद्ध, महिला, पुरुष आणि तरुणांना पुनरुज्जीवनाचा एक भाग बनून बौद्ध धर्माकडे पावले टाकण्यासाठी प्रोत्साहित करण्यात येणार आहे म्हणून बौद्ध उपासक उपासिका यांनी वर्षावास धम्मप्रवचनास जास्तीत जास्त संख्येत उपस्थित राहावे असे आवाहन समता सैनिक दल शाखा भद्रावती, जिल्हा चंद्रपूर. यांनी केले आहे.