Ballarpur City@ News
• श्री.सुधीरभाऊ मुनगंटीवार फॅन्स क्लब तर्फे गरजूंना ताडपत्री दिले
सुवर्ण भारत: शहर प्रतिनिधि, बल्लारपूर
बल्लारपूर: बल्लारपूर शहरातील समाजसेवी संस्था श्री सुधीरभाऊ मुनगंटीवार फॅन्स क्लब बल्लारपूर चे अध्यक्ष श्रीकांत आंबेकर यांना बल्लारपूर शहरातील सुभाषचंद्र बोस वार्ड येथील रहिवासी रमेश शामराव निकोडे यांचे घर या मुसळधार पावसामुळे घर गळत होता आणी घराचा काही भाग हा कोसळला
फॅन्स क्लब सदस्य किसन रैकवार यांना मिळाल्या नंतर संस्थेचे अध्यक्ष श्रीकांत आंबेकर कमल वर्मा, सुधाकर सिक्का व हेमंत यांनी घटना स्थळावर प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली व संस्थेतर्फे त्यांना गळणाऱ्या घरावर टाकायला ताडपत्री दिली. रमेश निकोडे यांनी संस्थेचे सर्व सदस्यांचे खूप खूप आभार मानले.
