Home Breaking News Chimur taluka@ News • जिर्ण ईमारत तोडून नविन इमारतीला मंजुरी द्या –...

Chimur taluka@ News • जिर्ण ईमारत तोडून नविन इमारतीला मंजुरी द्या – उपसरपंच सुनील नैताम यांची मागणी • शाळेच्या जुन्या जिर्ण इमारती पासुन विद्यार्थ्यांना धोका • १ ते ७ वर्गांचे सर्व विद्यार्थी बसतात धोकादायक खोलीत

149

Chimur taluka@ News
• जिर्ण ईमारत तोडून नविन इमारतीला मंजुरी द्या – उपसरपंच सुनील नैताम यांची मागणी

• शाळेच्या जुन्या जिर्ण इमारती पासुन विद्यार्थ्यांना धोका

• १ ते ७ वर्गांचे सर्व विद्यार्थी बसतात धोकादायक खोलीत

सुवर्ण भारत:शार्दुल पचारे

तालुका प्रतिनिधी, चिमूर
मोब.7887325430

चिमूर : – :चिमूर तालुक्यातील पुयारदंड येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत इयत्ता पहिली ते सातवी पर्यंत वर्ग आहेत. या शाळेच्या इमारती फार जुन्या असून जिर्ण होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे या जिर्ण इमारती पासुन विद्यार्थी आणि शिक्षकांच्या जिवाला धोका निर्माण होऊ शकतो. तरी या गंभिर बाबीची प्रशासनाने त्वरीत दखल घेऊन नविन इमारत मंजूर करावी अशी मागणी ग्राम पंचायत उपसरपंच सुनिल नैताम यांनी केली आहे. पुयारदंड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत एकुण पटसंख्या ५४ आहे. त्यामध्ये मुलं ३३ आणि मुली २१ आहेत. या सर्व विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी जिव मुठीत घेऊन शिक्षण घ्यावे लागत आहे. शाळेच्या दोन इमारती असून एका इमारतीची स्लॅप गळत असल्याने ती पळण्याच्या विळख्यात सापडली आहे. पुयारदड येथील सर्व विद्यार्थी हे थोडक्यात बसण्यायोग्य असलेल्या इमारतीच्या खोलीमध्ये बसत असून ती सुद्धा एका बाजूने दबली जात आहे व पावसाचे पाणी गळत आहे. यामुळे विद्यार्थ्यांना या इमारतीचा धोका निर्माण झाला आहे. प्राथमिक शिक्षण सक्तीचे आणि मोफत असलेल्या प्राथमिक शाळेची अशी दैनिय अवस्था झाली आहे. या शाळेत चार शिक्षक आपला जिवमुठित घेऊन विद्याथ्यर्थ्यांना शिक्षण देत असून विद्यार्थी सुद्धा अभ्यास करावा लागतो आपल्या जीवाची परवा न करता शिक्षण घेत क्षण घेत आहेत त्यामुळे प्रशासनाने या परिस्थितीचा गांभीर्य पाहता कुठलीही जीवित हाणी होऊ नये. होण्याअगोदर पुयारदंड येथील नवीन शाळेच्या इमारतीला मंजुरी द्यावी अशी मागणी ग्राम पंचायत सदस्य आणि गावकऱ्यांनी केली आहे.