Home Breaking News Varora taluka@ News •अखेर…. वडगाव ला पोहोचली बस

Varora taluka@ News •अखेर…. वडगाव ला पोहोचली बस

28

Varora taluka@ News
•अखेर…. वडगाव ला पोहोचली बस

सुवर्ण भारत:ग्यानीवंत गेडाम
वरोरा प्रतिनीधी

वरोरा : तालुक्यातील वडगांव गावाला काही काळापूर्वी बस सेवा चालू होती. परंतू मधल्या काळात ती बंद केली. बस सेवा बंद असल्याने गावकऱ्यांना आणि विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. त्या मुळे वडगांव वासियांनी शिवसेना तालुका प्रमुख-दत्ताभाऊ बोरेकर तसेच युवासेना तालुका समन्वयक-शुभम कोहपरे यांना हि माहिती दिली.त्यांनी तात्काळ वेळेचा विलंब न करता शिवसेने तर्फे आगार प्रमुख वरोरा यांना बस सुरु करण्याची मागणी करण्यात आली.आगार प्रमुखांनी हि मागणी पुर्ण केली .गावाला बस चालू झाली हे कळताच गावकरी मंडळीमधे उत्साहपूर्ण जोश तयार झाला आणि बसच्या स्वागता करिता हि मंडळी बस स्थानका जवळ गोळा झाले. या एस टी बसच्या स्वागता ला उपस्थित गुणवंत कोकांडे, रमेश दातारकर, सतीश बोरेकर, भास्कर उईके, प्रकाश कोकांडे, सुनील मडावी, गुणवंत बोरेकर, नत्थु पोंगडे, सुरेश बोरेकर, विलास डावे, संजय पेटकर, विजय धोटे, शुभम कोकांडे, राकेश पेटकर, अजय दातारकर, तुषार बोरेकर, प्रशांत धोटे, रोहन गोचे, वैभव बोरेकर, साहिल लडके आणि संपूर्ण वडगांववासी उपस्थित होते.
वडगाव वाशी यांनी शिवसेना तालुकाप्रमुख दत्ता बोरकर युवा सेना तालुका समन्वयक शुभम कोहपरे व युवा सैनिक तुषार बोरेकर यांच्या प्रयत्नातून बस चालू झाल्याने यांचे वडगाव वासि यांनी आभार मानले आहे.