Home Breaking News Varora city @news ⭕ हिरालाल लोया विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयात पालक शिक्षक...

Varora city @news ⭕ हिरालाल लोया विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयात पालक शिक्षक संघाची स्थापना

61

Varora city @news
⭕ हिरालाल लोया विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयात पालक शिक्षक संघाची स्थापना

सुवर्ण भारत: खेमचंद नेरकर
तालुका प्रतिनिधी, वरोरा

वरोरा:शिक्षण हा एक महत्वाचा राष्ट्रीय उपक्रम असून तो राष्ट्रीय कार्यक्रमाचा कणा आहे.राष्ट्रीय वृत्ती व राष्ट्रीय व्यक्तिमत्व यांची वाढ करणे,व्यक्तींमधे मुल्यांक संस्कार घडवणे,ज्ञानात्मक,भावनात्मक आणि क्रियात्मक अशा तिन्ही स्तरातून मूल्यांच्या संस्कारांची प्रक्रिया पूर्ण होईल हे पहावे लागते. ही मुल्ये विद्यार्थ्यांनी स्वीकारावीत अशा प्रकारची परिस्थिती,वातावरण निर्माण करण्यासाठी,विद्यार्थी योग्य दिशेने प्रगती करतो का हे पाहण्याच्या उद्देशाने पालक शिक्षक संघाची संकल्पना रुजली आहे.
हिरालाल लोया विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय वरोरा येथे दिनांक 02/08/2024 रोज शुक्रवारला पालक शिक्षक संघाची स्थापना करण्यात आली. पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष म्हणून विद्यालयाचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य सन्माननीय श्री महेश क.डोंगरे तर उपाध्यक्ष म्हणून सौ.सुवर्णा गिरीश टोंगे यांची निवड करण्यात आली सचिव म्हणून कनिष्ठ महाविद्यालयातील अध्यापक श्री रूपम डफ यांची निवड करण्यात आली त्याचप्रमाणे वर्ग ५ ते १२ चे पालक प्रतिनिधी आणि शिक्षक प्रतिनिधी यांची निवड करून पालक शिक्षक संघाची कार्यकारिणी गठित करण्यात आली.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक तथा प्राचार्य श्री महेश क.डोंगरे उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून विद्यालयाच्या उपमुख्याध्यापिका कु सुनिता मुळे, पर्यवेक्षिका सौ विना आंबटकर, पर्यवेक्षक श्री वामन आसुटकर, उपप्राचार्य श्री परसराम पवार उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे संचालन सौ माया बजाज यांनी केले प्रास्ताविक श्री गोविंद राजपूत यांनी तर आभारप्रदर्शन श्री मनोज लांबट यांनी केले.