Home Breaking News Ballarpur taluka@ news •कोठारीत घडला अपघात ! •ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

Ballarpur taluka@ news •कोठारीत घडला अपघात ! •ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

74

Ballarpur taluka@ news
•कोठारीत घडला अपघात !
•ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

सुवर्ण भारत: शंकर महाकाली (संपादक)

कोठारी : बल्लारपूरकडून गोंडपिंपरीकडे जाणाऱ्या दुचाकीस्वारास ट्रकने कोठारी येथील आशिष बार अँड
रेस्टाॅरंट जवळ राष्ट्रीय महामार्गावर आज दि.४ ऑगस्टला साय.५.३० वाजताच्या दरम्यान धडक दिली.यात दुचाकीस्वाराचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.
बल्लारपूर कडून गोंडपिपरी कडे दुचाकी क्र.एम.एच.३३ ए ए ६५८४ ने जात असताना कोठारी जवळ आशिष बार अँड रेस्ट।रंट जवळ ओव्हरटेक करीत असताना समोरून येणाऱ्या ट्रकने दुचाकीस धडक दिली.त्यात दुचाकीस्वार जागीच गतप्राण झाला.सदरहु प्रकरणाची माहिती कोठारी पोलिसांना मिळताच ते घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी मृतकास ताब्यात घेतले.या अपघाताची महिती गावात वाऱ्यासारखी पसरली असता गावकऱ्यांनी घटनास्थळाकडे धाव घेत एकच गर्दी केली.उसळलेल्या गर्दीला पोलिसांनी घटनास्थळारूवरून पांगविण्यात कसरत करावी लागली.मृतकाचे नाव वृत्त लिहिपर्यंत कळले नाही.पोलिसांनी मृतकाचे प्रेत शवविच्छेदन करण्यासाठी बल्लारपूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. अपघाताची नोंद कोठारीचे ठाणेदार आशिष बोरकर यांनी घेतली असून उशिरा पर्यंत गुन्ह्याची नोंद घेण्यात आली.अपघात करून पसार झालेल्या ट्रकचा शोध कोठारी पोलीस घेत आहेत.