Chandrapur city@ News
• सायकलने तब्बल 18000 किलोमीटरचा चारधाम यात्रा प्रवास करून चंद्रपूरात परत आलेल्या मयूर देऊरमलेचा डॉ. विश्वास झाडेंनी केला सत्कार !
चंद्रपूर :किरण घाटे
आजची तरुणाई भरकट चाललेली आहे ,नशेच्या वाईट व्यसनाच्या आहारी जाऊन स्वतःच्या आरोग्य खराब करत आहे .म्हणजेच तरुणाई व्यसनाधीन होत चालली आहे असे सगळे आरोप एका बाजूला होत असताना चंद्रपूर जिल्ह्यातील पोंभुर्णा तालुक्यातील घनोटी या छोट्या गावात वास्तव्य करणाऱ्या अवघ्या 23 वर्षीय मयूर देऊरमले यांनी 18000 किलोमीटर सायकलने प्रवास करून बारा ज्योतिर्लिंग व चार धाम यात्रा पूर्ण करून पाच महिन्यांमध्ये एक वेगळाच विक्रम नोंदविला आहे.चंद्रपूर येथे स्थानिक वरोरा नाका चौकात तो आला असता त्या ठिकाणी विदर्भ तेली समाज महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष, जीवन ज्योती प्रतिष्ठानचे अध्यक्ष, चंद्रपूरमधील सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉ. विश्वास झाडे व त्यांच्या मित्र परिवारांनी त्यांचे स्वागत करित त्याचा सत्कार केला.चंद्रपूर शहरातील नामवंत
डॉ.विश्वास झाडे हे भारतातल्या लद्दाख, मुंबई , हैद्राबाद, गोवा,बंगलोर, नागपूर येथील मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी झाले होते.तदवतच शहरातील पहिले आयरन मॅन पुरस्कार त्यांना प्राप्त झालेला आहे.
डॉ .झाडे यांना शारीरिक खेळात अमाप आवड आहे .खेळातून शारीरिक, बौद्धिक, मानसिक वाढ होते असे त्यांचे म्हणणे आहे.
. मयूरचा हा सायकल प्रवास नक्कीच सर्व युवकांना प्रेरणादायी ठरेल असा विश्वास डॉक्टर विश्वास झाडे यांनी आज व्यक्त केला.
यावेळी त्यांचा सोबत प्रख्यात छायाचित्रकार देवानंद साखरकर, प्राध्यापक श्याम हेडाऊ, झी मीडियाचे आशीष अंबाडे, सामाजिक कार्यकर्ते अमर रामटेके, दिक्षांत बेले व अन्य मित्र मंडळी उपस्थित होती.






