Home Breaking News Varora taluka@ News • हिरालाल लोया विद्यालयातील विद्यार्थ्यांची भारतीय अंतराळ संशोधन संस्था...

Varora taluka@ News • हिरालाल लोया विद्यालयातील विद्यार्थ्यांची भारतीय अंतराळ संशोधन संस्था ISRO च्या विदर्भ स्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धेसाठी निवड.

23

Varora taluka@ News
• हिरालाल लोया विद्यालयातील विद्यार्थ्यांची भारतीय अंतराळ संशोधन संस्था ISRO च्या विदर्भ स्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धेसाठी निवड.

सुवर्ण भारत: खेमचंद नेरकर
तालुका प्रतिनिधी, वरोरा

भारतीय अंतराळ संशोधन संस्था ISRO अंतर्गत व्ही. एन.आय. टि. तसेच विज्ञान भारती यांचे तर्फे जिल्हा स्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धा दिनांक 05.08.2024 ला ऑनलाईन आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत विद्यालयातील 5 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता . यामध्ये विद्यालयाचे दोन विद्यार्थी आर्यन पिसे, वर्ग 10 , वेदांत पोटे वर्ग 9, यांची विदर्भस्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धेसाठी निवड झाली. हे दोन्ही विद्यार्थी या स्पर्धेसाठी व्ही. एन.आय. टि. नागपूर दिनांक 07.08.2024 ल उपस्थित झाले. या विदर्भास्तरिय स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना रोख रुपये व ISRO भेट अश्याप्रकरचे बक्षीस दिले जाणार आहेत. विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान व तंत्रज्ञान विषया प्रती जागरूकता निर्माण करणे व वैज्ञानिक दृष्टिकोन जागृत करणे या उद्देशाने अशाप्रकारची प्रश्नमंजुषा आयोजित केली जाते. या स्पर्धेच्या टॉप 8 मध्ये या दोन्ही विद्यार्थ्यांची निवड झाली त्यानंतर अंतिम फेरी मध्ये विद्यालयाच्या आर्यन पिसे ने द्वितीय स्थान व वेदांत पोटे याने चतुर्थ स्थान पटकाविले व विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला . या स्पर्धेत आर्यन पिसे याचे उपस्थित ISRO चे शास्त्रज्ञ यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.

स्पर्धेतील विजयी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष नीरज गोठी सचिव कृष्णकांत लोया तसेच प्राचार्य तथा मुख्याध्यापक महेश डोंगरे यांनी कौतुक अभिनंदन केले. तसेच उपमुख्याध्यापिका कूं.सुनीता मुळे , पर्यवेक्षिक सौ.वीणा आंबटकर व  वामन आसुटकर यांनी सुध्धा विद्यार्थ्यांचे कौतुक केले. या स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांना विद्यालयाच्या विज्ञान शिक्षिका कू.मीनाक्षी गज्जलवार व माया पोटे यांनी मार्गदर्शन केले तसेच सचिन ताजने,गोविंद राजपूत,सुरेंद्र झाडे ,मनीष नगराळे,मनोज लांबट, कू.स्मिता आस्वले यांचे सहकार्य लाभले. या सर्व विद्यार्थ्यांचे विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षिका तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.