Home Breaking News Chandrapur city@News • शासकीय कर्मचाऱ्यांच्या जोरदार घोषणाबाजीने जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दुमदुमला •...

Chandrapur city@News • शासकीय कर्मचाऱ्यांच्या जोरदार घोषणाबाजीने जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दुमदुमला • शेकडों राज्य कर्मचारी बांधवांचे चंद्रपूरात प्रलंबित मागण्यांसाठी निदर्शने!

36

Chandrapur city@News
• शासकीय कर्मचाऱ्यांच्या जोरदार घोषणाबाजीने जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दुमदुमला
• शेकडों राज्य कर्मचारी बांधवांचे चंद्रपूरात प्रलंबित मागण्यांसाठी निदर्शने!

चंद्रपूर:किरण घाटे

चंद्रपूरातील जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा परिषद कार्यालयासमोर आज दि.९ऑगस्टला दुपारी जिल्ह्यातील शेकडों राज्य कर्मचारी बांधवांनी आपल्या न्याय मागण्यासाठी जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने केली. नागपूर मुक्कामी दि.१४ डिसेंबर २०२३ रोजी विधानसभा अधिवेशनात राज्याच्या मुख्यमंत्र्यांना जुना पेन्शन ज्या सुधारित स्वरुपात देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्याचा ढाचा निवेदनाव्दारे विधानसभेच्या पटलावर ठेवला. त्यानुसार तत्संबंधातील अधिसूचना/शासन निर्णय पारित करण्याची कार्यवाही होणे अपेक्षित होते. परंतु त्याबाबत शासनाने कोणतीही अंमलबजावणी केलेली नाही. सदरची कार्यवाही सत्वर व्हावी यासाठी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, जिल्हा शाखा चंद्रपूरच्या वतीने ही निदर्शने करण्यात आली असल्याचे दिपक जेऊरकर यांनी शुक्रवारी आंदोलन दरम्यान सांगितले.

सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन धोरण दि. १ मार्च २०२४ च्या प्रभावाने लागू केल्यासंदर्भांतील अधिसूचना/शासन निर्णय पारित न करणे व जिल्हा परिषद/शिक्षक यांचे बाबतीत शासनाने घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी न होणे तसेच प्रलंबित इतर मागण्यांचा देखील शासनास विसर पडलेला आहे. सरकारने घेतलेल्या धोरणात्मक निर्णयाची अंमलबजावणी विधानसभा निवडणुकांचा आचारसंहिता कालावधी सुरु होण्यापूर्वी होणे अनिवार्य आहे. दि. १ नोव्हेंबर २००५ पूर्वीची जाहिरात/अधिसूचनांव्दारे नियुक्त झालेल्या जिल्हा परिषद कर्मचारी व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांचेबाबत अद्याप अंमलबजावणी संदर्भात संदिग्धता दिसून येते. ही बाब सर्वस्वी अनाकलनीय आहे. त्या अनुषंगाने शासकीय कर्मचारी यांनी आपला असंतोष व्यक्त करत जोरदार निदर्शने दिली . दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा यांचे मार्फत प्रलंबित मागण्यां संदर्भात निवेदन सादर करण्यात आले.

या प्रसंगी नागपूर शिक्षक मतदार संघाचे आमदार सुधाकर अडबाले, राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे अध्यक्ष दिपक जेऊरकर, सरचिटणीस राजु धांडे, राजपत्रित महासंघाचे अध्यक्ष अरुण तिखे, राकेश शेंडे, वनपरीक्षेत्र अधिकारी स्वाती महेशकर, वनपरीक्षेत्र अधिकारी घनश्याम नायगमकर यांनी प्रलंबित मागण्यांसंदर्भात उपस्थित कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले.
सदरहु आंदोलनाचे सुत्र संचालन अविनाश बोरगमवार यांनी केले तर आभार प्रदर्शन अजय मेकलवार यांनी केले.

या निदर्शने आंदोलनात सुधाकर अडबाले, दिपक जेऊरकर, राजु धांडे, श्रीकांत येवले, अविनाश बोरगमवार, अतुल किनेकर, सीमा पॉल, प्रविणअदेंकीवार, मनोज धाईत, रजनी आनंदे, किरण वैरागडे, सतीश असरेट, आकाश पेटकुले,शैलेश जुमनाके, धनराज मस्के, भाग्यश्री श्रीरामे, अनुप भोयर, नम्रता सरोवरे, राकेश शेंडे, अजय मेकलवार, अजय चहारे, राजपत्रित अधिकारी महासंघाचे पदाधिकारी तसेच इतर सर्व शासकीय कार्यालयीन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सहभाग दर्शविला होता.