Home Breaking News Chandrapur city@ News •चंद्रपूरात राष्ट्रीय जनहित पार्टीच्या वतीने आगामी विधानसभा निवडणूक लढण्यास...

Chandrapur city@ News •चंद्रपूरात राष्ट्रीय जनहित पार्टीच्या वतीने आगामी विधानसभा निवडणूक लढण्यास इच्छुक असणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखती •शासकीय विश्रामगृहात होती अनेकांची उपस्थिती

235

Chandrapur city@ News
•चंद्रपूरात राष्ट्रीय जनहित पार्टीच्या वतीने आगामी विधानसभा निवडणूक लढण्यास इच्छुक असणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखती
•शासकीय विश्रामगृहात होती अनेकांची उपस्थिती

चंद्रपूर:किरण घाटे

महाराष्ट्र राज्याचे माजी पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी नव्यानेच स्थापन केलेल्या राष्ट्रीय जनहित पार्टी तर्फे आगामी चंद्रपूर विधानसभा निवडणुक लढण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या दि.१३ऑगस्टला दुपारी १वाजता चंद्रपूर येथील शासकीय विश्रागृहात मुलाखती घेण्यात आल्या. या वेळी अनेकांनी आपली उपस्थिती लावली होती.
माजी पोलिस महासंचालक पांडे यांचे खंदे समर्थक असलेले महाराष्ट्र राज्याचे पोलीस बॉईज असोसिएशनचे संस्थापक- अध्यक्ष प्रमोद वाघमारे यांच्या प्रमुख उपस्थितीत इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या .
दरम्यान चंद्रपूरच्या शासकीय विश्रामगृहात मुलाखत देण्यासाठी इच्छुकांची भाऊगर्दी झाली होती .यात प्रामुख्याने सेवानिवृत्त पोलीस अधिकारी संघटना , सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते , माजी नगरसेवक ,शहरी भागासह ग्रामीण भागातील विविध संघटनांचे अध्यक्ष व पदाधिकारी यांचा समावेश होता असे पोलिस बाॅईज असोसिएशनचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष तथा चंद्रपूर जिल्हाध्यक्ष भुवनेश्वर निमगडे यांनी सांगितले.
या वेळी चंद्रपूर जिल्हा पोलिस सेवानिवृत्त संघटनेचे जिल्हाध्यक्ष ए.एल. काटकर ,जिल्हा उपाध्यक्ष भडके गंगाधर पिदुरकर , सोनकर वाघमारे ,खोब्रागडे, या शिवाय
भास्कर वाढई ,भैय्याजी मानकर , विष्णू चापडे, आशा राजभर,मोहन आत्तेकर , दिलीप उरकूंदे, सचिन बुरडकर, सचिन दानव, देविदास बोबडे, विशाल अमूतकर,बशीरभाई अन्सारी, सद्दाम अन्सारी, अनिल वैद, मनोज मेंढे, रवी घंटलवार, प्रवीण भुजाडे, केशव किन्नाके, अक्षय धानोरकर, अक्षय भिवगडे, रवी सहस्त्रबुध्दे,कविता तिमा, सविता खुटेमाटे, अनिता बोनगिरवार, संगीता कुडावले, सुनिता बावणे, ज्योती राऊत, सोनल साखरकर, माया पाझनकर, अनिता पेन्दाम, सुवर्णा खोब्रागडे, समीनदारा बोरकर, अनिता चौधरी,सुनीता बरसागडे, सूर्यकांता जुमनाके, अर्चना ठाकरे,नेहा सारसर आदिं उपस्थित होते .