Home Breaking News Ghugus City@ News • राज्यस्तरीय कराटे क्रिडा मध्ये चंद्रपूर जिल्हात उपविजेतेपद

Ghugus City@ News • राज्यस्तरीय कराटे क्रिडा मध्ये चंद्रपूर जिल्हात उपविजेतेपद

90
{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{"square_fit":1,"transform":1},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":true,"containsFTESticker":false}

Ghugus City@ News
• राज्यस्तरीय कराटे क्रिडा मध्ये चंद्रपूर जिल्हात उपविजेतेपद

सुवर्ण भारत: पंकज रामटेके
सहाय्यक जिल्हा प्रतिनीधी, चंद्रपूर

चंद्रपूर: दिनांक १० व ११ ऑगस्ट २०२४ रोजी बॅडमिंटन हॉल,जिल्हा क्रीडा संकुल, बारामती येथे महाराष्ट्र राज्य स्तरीय कराटे क्रीडा स्पर्धा पार पडल्या. स्पर्धेचे उदघाटन सौ. शर्मिला पवार यांच्या हस्ते करण्यात आले तसेच बक्षीस वितरण कराटे अससोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे अध्यक्ष युगेंद्र पवार यांचे हस्ते केल्या गेले. १२ जिल्ह्यातील ४०० हुन अधिक स्पर्धाकांनी या स्पर्धेत भाग घेतला.

यात १६ विध्यार्थ्यांनी चंद्रपूर जिल्ह्याचे नेतृत्व करीत ११ गोल्ड, १० सिल्वर,९ ब्रॉन्झ अश्या एकूण ३० पदकांची लूट केली. १४ वर्षा आतील मुलींच्या गटात कु. माहीन सिकंदर खान १गोल्ड,१ब्राँझ मेडल, कु.शौर्या अमोल गिरडकर१ गोल्ड१ ब्राँझ मेडल, कु.मारिया हाकीम हुसैन १गोल्ड १सिल्व्हर मेडल,कु.विहाना जितेंद्र सुहाग १ गोल्ड१सिल्व्हर मेडल,कु.स्वानंदी पवन कातकर २ ब्राँझ मेडल, कु. गार्गी दिवेश नाथवाणी १गोल्ड१ सिल्व्हर मेडल, कु.रिद्धी माधव लाकडे १गोल्ड १ब्राँझ मेडल, कु. स्वरा विवेक वासलवार १सिल्व्हर१ ब्राँझ मेडल पटकाविले.

१४ वर्षा आतील मुलांच्या गटात रिशिक अमोल गिरडकर २गोल्ड मेडल,ओम जगदीश लोणकर१ सिल्व्हर१ब्राँझ मेडल,आराध्य प्रवीण जुमनाके१ सिल्व्हर १ब्राँझ मेडल , निश्चय दीप किशोर गोडा २सिल्व्हर मेडल.

१४वर्षा वरील मुलींच्या गटात कु. आर्थिका संजय उपाध्ये गोल्ड मेडल तसेच १४ वर्षा वरील मुलांच्या गटात शौर्य विवेक बोढे १गोल्ड १ ब्राँझ मेडल, सिद्धांत सेडामे १सिल्व्हर १ ब्राँझ मेडल व नरेश दानबहादुर थटाल गोल्ड मेडल असे चंद्रपूर साठी ऐकून ३० मेडल जिंकून कराटे क्षेत्रात आपला दबदबा कायम ठेवला. विजयी स्पर्धाकाची दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय कराटे स्पर्धेसाठी निवड झालेली आहे. राष्ट्रीय स्पर्धेसाठी लागणारी एन्ट्री फी व ट्रॅक सूटचा खर्च कराटे अससोसिएशन ऑफ महाराष्ट्र करणार आहे असे संघटनेचे सचिव शिहान रवींद्र बाळकृष्ण कराळे यांनी सांगितले. आंतर शालेय व आंतर विद्यापीठ स्पर्धा नियमित होतील असे आश्वासन संघटनेचे अध्यक्ष श्री.युगेंद्र दादासाहेब पवार यांनी दिले.
विजयी चमूचे प्रशिक्षक म्हणून सेन्सेई मंजित अजित मंडल व संघ व्यवस्थापक म्हणून सेन्सेई रवी चरूरकर यांनी परिश्रम घेतले. विजयी स्पर्धाकांनी आपल्या यशाचे श्रेय चंद्रपूर जिल्हा संघटना अध्यक्ष सेन्सेई रवींद्र मुक्के आणि शिहान विनय बोढे तसेच जेष्ठ प्रशिक्षक मुहाफिज सिद्दीकी व पालकांना दिले. सर्व विजयी खेळाडू हे फिट्टूफाईट्स मार्शल आर्ट्स सेंटर जगन्नाथ बाबा नगर चंद्रपूर व शिवाजी कराटे क्लब चंद्रपूर येथील नियमित सराव करणारे विध्यार्थी असून महाराष्ट्राचे नेतृत्व दिल्ली येथे करणार आहेत.