Home Breaking News GhugusCity@News • लाॅयड्स मेटल उद्योगात स्वतंत्र दिवस उत्साहात साजरा

GhugusCity@News • लाॅयड्स मेटल उद्योगात स्वतंत्र दिवस उत्साहात साजरा

142

GhugusCity@News
• लाॅयड्स मेटल उद्योगात स्वतंत्र दिवस उत्साहात साजरा

सुवर्ण भारत: पंकज रामटेके

सहाय्यक जिल्हा प्रतिनिधी चंद्रपूर

घुग्घुस : लाॅयड्स मेटल अँड एनर्जी लिमिटेड उद्योगात गुरुवार,१५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.

याप्रसंगी कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक राजेश गुप्ता यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले,राष्ट्रगीत गाऊन तिरंगा झेंड्याला सलामी देण्यात आले.

त्यानंतर व्यवस्थापकीय संचालक राजेश गुप्ता, मधुर गुप्ता वरीष्ठ प्रबंधक कर्मचारी मंचावर उपस्थित राहून कार्यक्रम उत्साहात करण्यात आले.तसेच लाॅयड्स मेटल्स अँड लाॅयड्स इन्फिनिट फाउंडेशन तर्फे कंपनीच्या आजुबाजुच्या गावा-गावातील १२वीत चांगलेच मार्क घेवून उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थांना काॅलरशीपच्या चेक देवुन सत्कार करण्यात आले.

कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक राजेश गुप्ता यांने सर्व कामगार,कर्मचारी यांना देश-भक्त स्वतंत्र दिवसाचे मार्गदर्शन करण्यात आले.
तसेच कॅरम,बृदिबळ यांचा टूर्नामेंट मध्ये सहभाग घेण्यात आलेले,व प्रथम,द्वितीय व तृतीय क्रमांक आलेले कर्मचार्यांना बक्षीस वितरण करण्यात आले,व सुरक्षा रक्षकांनापण बक्षीस देण्यात आले.तसेच देश-भक्ती गीत म्हण्यात आले,तसेच मिठाई वाटप करण्यात आले.

याप्रसंगी कंपनीचे वरीष्ठ प्रबंधक, स्थायी,अस्थायी सर्व कामगार कर्मचारी एकत्रित येऊन स्वतंत्र दिवस उत्साहात कार्यक्रम समारंभ साजरा करण्यात आला.