Home Breaking News Bhadrawati taluka@news • हेल्पींग हँड्स NGO भद्रावती तर्फे ३ री सामान्य ज्ञान...

Bhadrawati taluka@news • हेल्पींग हँड्स NGO भद्रावती तर्फे ३ री सामान्य ज्ञान परीक्षा यशस्वी

155

Bhadrawati taluka@news
• हेल्पींग हँड्स NGO भद्रावती तर्फे ३ री सामान्य ज्ञान परीक्षा यशस्वी

सुवर्ण भारत : मनोज मोडक
तालुका प्रतिनिधि,भद्रावती

भद्रावती, ७७ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त भद्रावती शहरामध्ये स्थानिक NGO हेल्पींग हँड्स मल्टीपर्पज सोसायटी भद्रावती तर्फे ‘स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्ष ३ रे’ सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षेचे आयोजन करण्यात आले. शैक्षणिक क्षेत्रातील मुलांना भविष्यात होणाऱ्या स्पर्धा परीक्षेबाबत जागृती व आत्तापासूनच सवय लागावी या अनुषंगाने ते भविष्यात लवकरच यश प्राप्त करून देशाच्या व समाजाच्या योगदानास हातभार लावतील हे उद्देश सामोर ठेवून हेल्पिंग हँड्स सातत्याने शैक्षणिक क्षेत्रात काम करत आहेत.
ही परीक्षा दि. ११ ऑगस्ट २०२४ रोजी घेण्यात आली आणि निकाल १५ ऑगस्ट २०२४ रोजी लावण्यात आला. परिक्षा केंद्राचे ठिकाण फेरीलँड स्कूल गवराळा, प्रिन्सिपल सौ वर्षा धानोरकर मॅडम यांनी उपलब्ध करून मोलाचे सहकार्य केले. जवळपास १००० विद्यार्थ्यांनी परीक्षेमध्ये आपला सहभाग नोंदविला.
ही परिक्षा तीन गटांमध्ये घेण्यात आली.
अ गटामधून पहिला क्रमांक अंशुमन रोहनकर, दुसरा क्रमांक ऋतुजा लांडगे, तिसरा क्रमांक तमन्ना नागोसे यांनी पटकाविला, तर प्रोत्साहनार्थी बक्षिसे आरोही वेल्हे, पवी भारापात्रे, श्रेया खोब्रागडे यांना देण्यात आले.
ब गटामधून पहिला क्रमांक लक्ष्मी बदखल, दुसरा क्रमांक भाग्यश्री फोफरे, तिसरा क्रमांक वैशाली बेताल यांनी पटकाविला, तर प्रोत्साहनार्थी बक्षिसे समृद्धी रामटेके, संपदा पोहनकर, वेदांत नगराळे, दुर्गेश्वरी खापणे यांना देण्यात आली.
क गटामधून पहिला क्रमांक अनुष्का जवळे, दुसरा क्रमांक गायत्री पांडे, तिसरा क्रमांक कुणाल डोंगे यांनी पटकाविला तर प्रोत्साहनार्थी बक्षीसे साक्षी जुमडे, श्रेया मोवाडे, दिव्या मत्ते यांना देण्यात आले.
सर्व विजेत्यांना रोख रक्कम – संगीता बांबोडे, अमित सज्जल, स्वप्निल मत्ते, प्राची वेल्हेकर, राजरत्न पेटकर, आकाश गवारे, शीतल मांडवकर या दान दात्यांकडून देण्यात आले आणि ट्रॉफी अतुल दोडके कडून देण्यात आल्या तर सर्टिफिकेट संस्थेकडून देऊन सर्वांचा सन्मान करण्यात आले.
हेल्पिंग हँड्स टीमचे सर्व सदस्य सोनल उमाटे, सागर निरंजने, कृतांत सहारे, मनोज पेटकर, अंकित तोडे, स्नेहा सातपुते, रीता सहारे, प्रशांत सातपुते, कैश शेख, दीपक कावटे, निखिल उंबरकर, आशिष मल्लेलवार, श्वेता उंबरकर, स्वप्निल मत्त्ते, तुषार दुर्गे, हर्षदा हिरादेवे, सुकेशनी मानकर, प्राप्ती देवगडे, लीना उराडे, आझाद कुडसंगे, अभिनव पाझारे, राकेश चटपलीवार, प्रशिक लोणारे, वनश्री तूर्के, काजल शेरकी, नम्रता इंगोले, अक्षय लोहोकरे, श्रुती चटपल्लीवार, सौरभ मल्लेलवार, प्राजक्ता फुलझेले, क्रिश भोस्कर, साहिल शेख, अश्विन सिद्धमशेट्टीवार, पंकज खामनकर, कार्तिक गाडपात्रे, श्रेयस कांबळे, प्रियंका मांढरे, समय हिरादेवे, जया सपाटे, सुजाता कवाडे, प्रज्ञा खोब्रागडे, मनीष वाढई, पौर्णिमा डाखरे, भरत मेश्राम, आणि इतर सर्व सदस्य, मित्रमंडळ, आणि हितचिंतक यांनी मिळून हा कार्यक्रम यशस्वी करण्यात मोलाचे योगदान दिले.