Home Breaking News Ghugus City@ News • घुग्घुस न.प.तर्फे स्वच्छ महाराष्ट्र अभियान माजी वसुंधरा,स्वच्छता मित्र,स्वच्छ,पर्यावरण...

Ghugus City@ News • घुग्घुस न.प.तर्फे स्वच्छ महाराष्ट्र अभियान माजी वसुंधरा,स्वच्छता मित्र,स्वच्छ,पर्यावरण दुत अभियान •श्री.सत्यशिव गुरुदेव सेवा मंडळातर्फे अभियान सुरुच

180

Ghugus City@ News
• घुग्घुस न.प.तर्फे स्वच्छ महाराष्ट्र अभियान माजी वसुंधरा,स्वच्छता मित्र,स्वच्छ,पर्यावरण दुत अभियान
•श्री.सत्यशिव गुरुदेव सेवा मंडळातर्फे अभियान सुरुच

सुवर्ण भारत:पंकज रामटेके
सहाय्यक जिल्हा प्रतिनीधी, चंद्रपूर

घुग्घुस:नवनियुक्त नगरपरिषदचे आजपासुन पदभार आरोग्य निरीक्षक अधिकारी अनिल डोंगरे प्रमुख पाहुणे म्हणून व तसेच स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी)२.० स्वच्छता मित्र मारोती जुमनाके यांच्या सत्यशिव गुरुदेव सेवा मंडळ,जेष्ठ नागरिक संघातर्फे त्याच्या सत्कार करण्यात आले.
हेड सुपरवाइज़र सुरज जंगम, नगरपरिषदचे कर्मचारी टिम स्वच्छता अभियान सुरुच पासुन श्रमदान करण्यात येत आहे.

सार्वजनिक,धार्मिक स्थळ, ग्राम स्वच्छता अभियान अंतर्गत स्वच्छता श्रमदान यज्ञ बरेच वर्षापासून सुरुच आहे.

तसेच दि.२३ आगष्ट २०२४ शुक्रवार सकाळ रोजी शिवनगर रोड माता मंदिर येथे पोच्चमा देवी यांच्या मुर्तीची सामुहिक द्विपजलीत करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.तसेच परिसरातील साफसफाई राबविण्यात आली आहे.

स्वच्छता नागरिकांचे श्रमदान यज्ञा पूर्ण करा गावा-गावात, घरातील, परिसरातील वातावरण स्वच्छ ठेवा.असे मनोगत व्यक्त जेष्ठ नागरिक संघ,श्री.सत्यशिव गुरुदेव सेवा मंडळातर्फे व नगरपरिषद कर्मचारी दर शुक्रवारला स्वच्छता अभियान सुरुच आहे.

माता मंदिराचे सेवा करणारे दिपक मिसाला,शेखर तंगलापेल्ली,श्रीनिवास गुडला,अरुण दामेर,वसंत कलवल यांनी स्वच्छ अभियानायात कटीश्रम घेतले,आणि जेष्ठ नागरिक,श्री.सत्यशिव गुरुदेव सेवा मंडळ व नगरपरिषद कर्मचारी यांच्या सत्कार करुन आभार व्यक्त करण्यात आले.

याप्रसंगी श्री.सत्यशिव गुरुदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष मधुकर मालेकर,जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष नीलकंठ नांदे,संचालक नंदकुमार ठेगणे,मारोती पिंपळकर,भैया वाघमारे,सुरेश ढवस,गोविंदा जांबुळकर,ज्ञानेश्वर काळे,जनार्दन गोबाडे,चंद्रगुप्त घागरगुंडे,अनिल मानकर,पुंडलिक धांडे,भारती सौदारी, मधुकर समर्थ आदी उपस्थित होते.