Home Breaking News वरोऱ्यात अवैधरित्या शस्त्र बाळगणाऱ्या इसमावर कारवाई • आरोपीकडून 1 लाख 97 हजार...

वरोऱ्यात अवैधरित्या शस्त्र बाळगणाऱ्या इसमावर कारवाई • आरोपीकडून 1 लाख 97 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

81

• वरोऱ्यात अवैधरित्या शस्त्र बाळगणाऱ्या इसमावर कारवाई
• आरोपीकडून 1 लाख 97 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

सुवर्ण भारत: खेंमचंद नेरकर
तालुका प्रतिनिधी, वरोरा

वरोरा : एका मुखबीर द्वारे 23 आगस्ट 2024 ला एका इसमाचे घरी अवैध शस्र असल्याची वरोरा पोलिसांना माहिती मिळाली. माहितीनुसार सदर ठिकाणी पोलीस स्टॉप पोहचला. आरोपीच्या राहत्या घराची झडती घेतली असता घरातील तळमजला मध्ये बेडरूममधील लाकडी बेड चे खाली एक लोखंडी तलवार, एकूण लांबी 32इंच किंमत अंदाजे 5000 रू., एक ब्रूट कंपनीची काळ्या रंगाची लोखंडी एअर पिस्टल किमत अंदाजे 2000 रू. आणि आरोपी जाकीर अयुबखान यांचे ताब्यातून एपलं कंपनीचा अंड्राईड मोबाईल किंमत 50 हजार रू. विवो कंपनीचा एड्राईड मोबाईल किंमत अंदाजे 40,000 रू. आरोपी आसिफ अयुबखान याचे ताब्यातून सॅमसंग कंपनीचा एड्राईड मोबाईल किंमत अंदाजे 100000 लाख रू. असा एकूण 1 लाख 97000 रू. चा मुद्देमाल मिळून आला. सर्व मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
आरोपी विना परवाना शस्त्र बाळगून असता मिळून आला. आरोपिंचे विरोधात कलम 4,25 भारतीय हत्यार कायदा अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. गुन्ह्यात आरोपी जाकीर अयुब खान वय 34 वर्ष, धंदा ट्रान्सपोर्ट,
आसिफ अयुब खान वय 35 वर्ष, धंदा ट्रान्सपोर्ट दोन्ही रा. राजनगर
गोविंद मार्ट च्या बाजूला वरोरा येथे राहणारे आहे. दोन्ही आरोपीना अटक करण्यात आली आहे.
सदर गुन्ह्यांची कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधू, सहा. पोलीस अधीक्षक नयोमी साटम, पो. नी. महेश कोंडावार, स्थानिक गुन्हा शाखा चंद्रपूर, पोलीस निरीक्षक अजिंक्य तांबडे, यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि विनोद जांभळे, पो उपनी विनोद बुरुले स्थानिक गुन्हा शाखा चंद्रपूर, तसेच पोलीस स्टेशन वरोरा येथील डि बी पथकातील हेड कॉन्स्टेबल दिलीप सुर, पो. अ मोहन निषाद,संदीप मुळे, शशांक बदामवार, महेश गावतुरे, विशाल राजूरकर, स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर पोलीस स्टॉप च्या मदतीने करण्यात आली.