Home Breaking News Chandrapur City@News •सकल हिंदू समाजाच्या वतीने चंद्रपूरात आक्रोश मोर्चा ! •शहरातील व्यापारपेठ...

Chandrapur City@News •सकल हिंदू समाजाच्या वतीने चंद्रपूरात आक्रोश मोर्चा ! •शहरातील व्यापारपेठ बंद !

56

Chandrapur City@News
•सकल हिंदू समाजाच्या वतीने चंद्रपूरात आक्रोश मोर्चा !
•शहरातील व्यापारपेठ बंद !

चंद्रपूर :किरण घाटे

बांगलादेशात हिंदू समाजावर झालेल्या अत्याचाराच्या विरोधात सकल हिंदू समाजाच्या वतीने आज शुक्रवारी चंद्रपूर बंदची हाक देण्यात आली होती. दरम्यान दुपारी ११वाजता एका भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.
सदरहु मोर्चा स्थानिक पटेल हायस्कूल जवळील शिवाजी चौकातून निघून तो गांधी चौक मार्गे होत मुख्य मार्गाने चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धडकला .या मोर्चात प्रामुख्याने ना.सुधीर मुनगंटीवार व चंद्रपूरचे विद्यमान आमदार किशोर जोरगेवारांसह विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकारी स्वयंस्फूर्तीने सहभागी झाले होते. शहरातून निघालेल्या या मोर्चाचे गांधी चौकात यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने स्वागत करण्यात आले. चंद्रपूर बंदच्या हाकेला स्थानिक व्यापारी बांधवांनी प्रतिसाद देत आप आपली प्रतिष्ठाने बंद ठेवली . मोर्चा दरम्यान पोलिस प्रशासने शहरात तगडा पोलिस बंदोबस्त ठेवला होता.हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेल्या नंतर एका शिष्टमंडळाने दुपारी चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा यांना एक निवेदन सादर केले.