Home Breaking News • मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्याहस्ते कोट्यवधी रुपयांच्या विकास कामांचे लोकार्पण ...

• मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्याहस्ते कोट्यवधी रुपयांच्या विकास कामांचे लोकार्पण • उर्वरित विकास कामांना निधी देणार असल्याचे आश्वासन

67

• मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्याहस्ते कोट्यवधी रुपयांच्या विकास कामांचे लोकार्पण

• उर्वरित विकास कामांना निधी देणार असल्याचे आश्वासन

सुवर्ण भारत शंकर महाकाली ( संपादक)

अहेरी:तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेल्या आलापल्ली ग्रामपंचायत मध्ये राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्याहस्ते शनिवारी (२४ ऑगस्ट) रोजी कोट्यवधी रुपयांच्या विकास कामांचे लोकार्पण करण्यात आले.

अहेरी उपविभागतील आलापल्ली हे शहर एटापल्ली,भामरागड, सिरोंचा, अहेरी आणि मुलचेरा या पाच तालुक्यांसाठी मध्यवर्ती ठिकाण असून येथील सर्वच प्रभागामध्ये विविध विकास कामांसाठी मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी कोट्यवधींची निधी उपलब्ध करून दिली.जवळपास पाच कोटींच्या निधीतून सिमेंट रस्ते,मोरी बांधकाम, समाज भवन यासह आदी विकास कामे करण्यात आले असून आणखी काही कामे प्रगतीपथावर आहेत.

राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम मागील काही दिवसांपासून जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून शनिवार (२४ ऑगस्ट) रोजी आलापल्ली येथील विविध प्रभागातील विकास कामांचे त्यांच्याहस्ते लोकार्पण करण्यात आले.विशेष म्हणजे विविध प्रभागात पायी जाऊन केलेल्या विकास कामांचे लोकार्पण केले आणि प्रभागातील नागरीकांशी संवाद देखील साधला.यावेळी अनेक वर्षांनी गल्लीतील रस्ते व नाली बांधकाम यासह आदी विकास कामे पूर्णत्वास आल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केला.

यावेळी आलापल्ली ग्रामपंचायतचे सरपंच शंकर मेश्राम,राष्ट्रवादी काँग्रेसचे अहेरी विधानसभा अध्यक्ष लक्ष्मण येर्रावार,राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते कैलास कोरेत,बालाजी गावडे,सांबय्या करपेत,ग्रा.प.सदस्य पुष्पा अलोने, स्वप्नील श्रीरामवार, सोमेश्वर रामटेके, माजी ग्रा.प.सदस्य पेद्दीवार,पराग पांढरे,मांतय्या आत्राम,बाबुराव तोर्रेम, रतन दुर्गे,विशेष भटपल्लीवार, आदित्य जक्कोजवार,महेश येर्रावार,शुभम चिंतावार तसेच विविध प्रभागातील, राकॉचे कार्यकर्ते व जेष्ठ नागरिक उपस्थित होते.

उर्वरित विकास कामांना निधी देणार
मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी आलापलीच्या विविध प्रभागात फिरून विकास कामांचे लोकार्पण केले.प्रत्येक प्रभागात पायी फिरत असताना त्यांना काही ठिकाणी अजूनही विकास कामासाठी निधी लागत असल्याचे लक्षात आले.यावेळी त्यांनी येथील सरपंच व सदस्यांना तात्काळ माहिती सादर करण्याचे निर्देश दिले.