Home Breaking News आयटक — संयुक्त खदान मजदूर संघाचे स्नेह मिलन संमेलन संपन्न

आयटक — संयुक्त खदान मजदूर संघाचे स्नेह मिलन संमेलन संपन्न

62

आयटक — संयुक्त खदान मजदूर संघाचे स्नेह मिलन संमेलन संपन्न

भद्रावती -प्रतिनिधी

येथील आयटक संलग्न संयुक्त खदान मजदूर संघांचे एक दिवशीय “स्नेह मिलन “संमेलन नुकतेच समुदाईक भवन कुचना येथे संपन्न झाले. या कर्यक्रमाचे अध्यक्ष कॉमरेड एन .टी. मस्के अध्यक्ष एस के एम एस ( वेकोली ) बल्हारशा हे होते तसेच मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून कॉमरेड सी .जे .जोसेफ, एस .के .एम. एस .कामगार संघटना वेकोली आय एम डब्लू एफ जनरल सचिव नागपूर
कॉमरेड फ्रासिस दारा केंद्रीय समिती आलरनेट सदस्य चंद्रपूर कॉमरेड राजू गैनवार माजी नगरसेवक व कार्याध्यक्ष
आयटक कामगार संघटना भद्रावती
कॉमरेड जयनारायण पांडे प्रभारी केंद्रीय समिती सदस्य कॉमरेड दत्ता कोंबे एस के एम एस क्षेत्रीय अध्यक्ष माजरी कॉमरेड दीपक ढोके क्षेत्रीय सचिव एस के एम एस माजरी कॉमरेड बंडू उपरे कॉमरेड शंभु सिंग इत्यादी मंचावर मान्यवर उपस्थित होते.या वेळी पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले
उद्घाटनीय भाषण करताना कॉमरेड सी जे जोसेफ म्हणाले कि सरकारने सर्वाधिक प्राथमिकतेने सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगाच्या खाजगीकरण याला हात घातला आहे यातील काही उद्योग तोट्यात आहेत
खाजगीकरनाला विरोध केला पाहिजे कामगारांनी एक जुटीने लढा दिला पाहिजे बुधवार बंद आहे तो चालू झाला पाहिजे ओटी मिळाली पाहिजे वेकोलीचे मनिजमेंट कामगार संघटनेवर दबाव आणू पाहत आहेत याचा तीव्र विरोध झाला पाहिजे आयटक संलग्न एस के एम एस संघटना मजबूत करून 2024 / 2025 ची सदस्यता मोहीम हजारोंच्या संख्येत गेली पाहिजे
आयटक संघटना देशातील एकमेव कामगार संघटना आहे याचा इतिहास आहे देशातील कोळसा खदान खाजगीकरणातून वाचविले पाहिजे जगामध्ये जागतिक कामगारांचे आंदोलन अधिक तीव्र होत आहे असे ते म्हणाले
या वेळी मोठ्या संख्येने कामगार व महिला कामगार उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक कॉमरेड जयनारायण पांडे यांनी केलेसंचालन कॉमरेड मोहन सोरते व आभार प्रदर्शन कॉमरेड सुधाकर राऊत यांनी केले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कॉमरेड किशोर धोंगडे, कॉमरेड मंजू ठाकरे,कॉमरेड सातारकर,कॉमरेड हेमंत उरकुडे,कॉमरेड दातारकर,कॉमरेड भारत ठग,कॉमरेड दिलीप बूग्गेवार,कॉमरेड आकाश पोटे, कॉमरेड तुळशीराम शिवरकर,कॉमरेड वसंत सातभाई, कॉमरेड नारायण गिलबिले, यांनी अथक परीश्रम घेतले