Mul taluka@News
• राज्य सरकार विरोधात महाविकास आघाडीचे ठिक ठिकाणी धरणे आंदोलन!
• मूल नगरीत कांग्रेसचे दिग्गज नेते संतोष रावत यांच्या नेतृत्वात आंदोलन!
• आंदोलनात घनश्याम येनुरकर , राकेश रत्नावार, दत्तात्रय समर्थ, रुपाली संतोषवार ,समता बन्सोड, राजू कन्नमवार,महेश चौधरींसह अनेकांचा सहभाग!
चंद्रपूर:किरण घाटे
मूल :चंद्रपूर जिल्ह्यात आज अनेक ठिकाणी निदर्शने करण्यात आलीत.दरम्यान मूल नगरीत कांग्रेसचे जेष्ठ नेते संतोष रावत यांच्या नेतृत्वात स्थानिक गांधी चौकात सकाळी ११वाजता धरणे आंदोलन आयोजित केले होते .
या आंदोलनात प्रामुख्याने राकेश रत्नावर,घनश्याम येणूरकर, दत्तात्रय समर्थ, प्रभाकर कावडे, अतुल गोवर्धन विरई, बाळू करपे ,अनिल निकोडे,संदीप मोहबे, विष्णू साधवमवार, रुपाली संतोषवार, समता बन्सोड, फर्जाना शेख, राजू कन्नमवार, विवेक मुत्यलवार, महेश चौधरी अनिल सोनूले, आदिं सहभागी झाले होते.
अत्याचाराच्या घटना दिवसागणिक वाढत असून सदरहु घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी सर्वत्र होत असताना दिसली .
