Home Breaking News सहज सुचलंची नेहमीच प्रगतीच्या दिशेने वाटचाल – समाजसेविका मायाताई कोसरे

सहज सुचलंची नेहमीच प्रगतीच्या दिशेने वाटचाल – समाजसेविका मायाताई कोसरे

113

सहज सुचलंची नेहमीच प्रगतीच्या दिशेने वाटचाल – समाजसेविका मायाताई कोसरे

नागपूर :किरण घाटे

सामाजिक,साहित्यिक,शैक्षणिक,
क्रीडा व कला क्षेत्रातील कलावंतांना महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलं सदैव प्रोत्साहन देत असून हा महिला व्हाॅट्सअप गृप प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत असल्याचे मत सहज सुचलंच्या मुख्य मार्गदर्शिका तथा सुपरिचित समाजसेविका मायाताई कोसरे यांनी व्यक्त केले.

त्या काल संध्याकाळी उपराजधानी नागपूरस्थित आयोजित एका छोट्याखानी कार्यक्रमात मार्गदर्शन करताना बोलत होत्या .

दरम्यान त्यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणातून सहज सुचलं वरील पुरस्कार प्राप्त कवयित्री सुनिता महाजन, वैजयंती गहुकर, शैला चिमड्यालवार यांच्या नावांचा प्रामुख्याने उल्लेख केला तर सहज सुचलं वरील गुणवंत छोट्या मुर्त्या प्रियंका गायकवाड व रश्मि पचारे यांचे नांव घेण्यास त्या या वेळी विसरल्या नाहीत.

सलग तीन वर्षांपासून सहज सुचलंची संयोजिका म्हणून चंद्रपूरच्या रंज्जू दिलीप मोडक ह्या यशस्वीपणे धूरा सांभाळत आहे .अश्याही समाजसेविका मायाताई कोसरे या वेळी बोलताना म्हणाल्या !