Home Breaking News अनिता आंबटकर यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन!

अनिता आंबटकर यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन!

66

अनिता आंबटकर यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन!

चंद्रपूर :किरण घाटे

येथील स्थानिक अंचलेश्वर वार्डातील मुळ रहिवाशी असलेल्या अनिता विजयराव आंबटकर यांचे अल्पशा आजाराने दि.२५ऑगस्टला दुःखद निधन झाले.
मृत्यू समयी त्यांचे वय ५८ वर्षाचे होते. त्यांची अचानक प्रकृती बिघडल्यानंतर त्यांना शहरातील एका नामांकित हाॅस्पिटलला भरती करण्यात आले होते.त्यांच्यावर डॉ.मंडळीकडून उपचारही सुरू होता . परंतु त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही.शेवटी अनिता आंबटकर यांनी रुग्णालयातच अखेरचा श्वास घेतला.

त्यांच्या दुःखद निधनाची बातमी कानावर येताच महाराष्ट्रातील सहज सुचलं महिला व्हाॅट्सअप गृपच्या मुख्य मार्गदर्शिका मायाताई कोसरे ,अधिवक्ता मेघा धोटे, सहज सुचलंच्या मुख्य संयोजिका रंज्जू मोडक ,सहसंयोजिका नलिनी आडपवार ,जेष्ठ कवयित्री शैला चिमड्यालवार,समता बन्सोड,चंदा कामडी, किरणदिप व्हाॅट्सअप गृपच्या मुख्य मार्गदर्शिका किरण साळवी ,संस्कार पत संस्थेच्या संचालिका ज्योति घाटे, कोकिळा पोटदुखे, चंदा इटनकर, लोकहितच्या शहराध्यक्ष अंजली इटनकर,अर्चना समर्थ यांनी दिवंगत अनिताला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित केली.