Korpna Taluka News
• पिपर्डा येथील विना काठी विना तोरणपोळा उत्सव परंपरा कायम
• शेतकऱ्यांनी वाजत गाजत उत्सव संपन्न
सुवर्ण भारत: मनोज गोरे
प्रतिनिधी, चंद्रपूर
कोरपना: तालुक्यातील डोंगर पायथ्याशी वसलेले सर्व जाती धर्माचे नागरीक सलोख्याने नांदतात ३० वर्षापूर्वी बैलजोडी व तोरणावरून नित्याने वाद व्हायचे व सर्जा राजा चा उत्सवावर विर्जन पडायचे यावर तत्कालीन संरपच आबिद अली यांनी पुढाकार घेत वर्षभर राबराब राबणाऱ्या बैलपोळा हा बळीराजाचा आनंदाचा सन आंनंदायी शेतकऱ्यांनी वाजत गाजत मिरवणुक काढून बैल पोळ्यात सहभाग व्हावा म्हणून १९९४ मध्ये ग्रामसभेत ठराव पारीत करूण गावात तोरण बांधणार नाही तुतारी काठी पोळ्यात नेता येणार नाही जोडी निघण्याची स्पर्धा होणार नाही हा निर्णय घेतला तेव्हा पासून गावात भजन ढोल ताश्याने सर्जा राजाना सजावट करूण पोळा भरल्या जातो गावातील सर्व धर्माचे लोक मंदिराच्या पहारावर एकमेकाना शुभेच्छा देतात ही परंपरा ३० वर्षा पासून गावात नागरीक परंपरा चालवित असून अख्वा गाव महीला पुरुष बालगोपाल या सोहळ्यात सहभागी होतात यामुळे गावात शांतता व सलोखा निर्माण झाला आहे मंदिराच्या पहारावर आबिद अली माजी संरपच महादेव राठोड पोलीस पाटील ग्राम पंचायत सदस्य संजय जाधव जगदिश पिंपळकर रमेश डाखरे प्रभाकर पवार चन्द्रभान तोडासे दौलतगोरे पदमाकर लोडे वनवासु चॉदेकर इत्यादीनी शेतकरी बांधवाना शुभेच्छा दिल्या