Home Breaking News Gadchiroli Dist News • माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव महाराज यांच्या हस्ते आलापल्ली...

Gadchiroli Dist News • माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव महाराज यांच्या हस्ते आलापल्ली येथे शिवलिंग प्राण प्रतिष्ठापना. • गणेश मंदिर येथे विधिवत झाली शिवलिंग प्राण प्रतिष्ठापना.

85

Gadchiroli Dist News
• माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव महाराज यांच्या हस्ते आलापल्ली येथे शिवलिंग प्राण प्रतिष्ठापना.
• गणेश मंदिर येथे विधिवत झाली शिवलिंग प्राण प्रतिष्ठापना.

सुवर्ण भारत : शंकर महाकाली (संपादक)

अहेरी:- आता सुरू असलेल्या श्रावण महिन्याच्या पावन दिवसात मोठ्या श्रद्धेने आपण शंकराची पूजा अर्चना करत असतो.भगवान शंकरांना प्रिय असणारा हा श्रावण महिना अतिशय पवित्र मानला जातो.या महिन्यात भगवान शंकराची आणि देवी पार्वतींची खास पूजा केली जाते.महादेवांना समर्पित असणारी विविध व्रतवैकल्ये याच महिन्यात केली जातात.हा संपूर्ण महिना भगवान शंकरांनाच समर्पित आहे.ही व्रतवैकल्ये मनोभावे केल्याने भगवान शंकरांची आपल्यावर कृपा राहते.

याच श्रावनाच्या पावन महोत्सव निमित्ताने अहेरी तालुक्यातील आलापल्ली बाजारवाडी येथील गणेश मंदिर येथे मोठया भक्तीमय वातावरणात आणि ब्राह्मण,पुजारी यांच्या मंत्रोच्चाराने विधिवत शिवलिंग प्राण प्रतिष्ठापना अहेरी इस्टेटचे राजे तथा माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव महाराज यांच्या हस्ते करण्यात आली.
त्यावेळी राजे साहेबांनी भक्ती भावाने शिवलिंगाची पूजा अर्चना केली,माझ्या अहेरी विधानसभा क्षेत्रातील जनतेला सुख,समृद्धी दे आणि या क्षेत्रातील प्रत्येक प्रश्न दूर करण्यासाठी मला शक्ती प्रदान कर अशी प्रार्थना केली.!
तसेच भक्तजनांना राजे साहेबांच्या हस्ते महाप्रसादाचे वितरण करण्यात आले.

यावेळी मंदिराचे पुजारी,शिव भक्तगण,स्थानिक गावक री मोठ्या संख्येने उपस्थित होते.