Home Breaking News Varora Taluka News “आनंद निकेतन महाविद्यालयात पालक शिक्षक संघाची सभा संपन्न...

Varora Taluka News “आनंद निकेतन महाविद्यालयात पालक शिक्षक संघाची सभा संपन्न “

16

Varora Taluka News

“आनंद निकेतन महाविद्यालयात पालक शिक्षक संघाची सभा संपन्न “

सुवर्ण भारत: खेमचंद नेरकर
तालुका प्रतिनिधी, वरोरा

वरोरा:आनंद निकेतन कनिष्ठ महाविद्यालय आनंदवन वरोरा येथे, दिनांक २१/०९/२०२४ रोज शनिवार ला “पालक शिक्षक संघाची सभा संपन्न झाली. ” व्यसनमुक्त विद्यार्थी घडविण्यासाठी पालक आणि शिक्षक यांची भूमिका ” या विषयावर सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले.
             या कार्यक्रमाचे अध्यक्ष मान.उपप्राचार्य प्रा.राधा सवाने, प्रमुख उपस्थिती प्रा. गोपाल वरुटकर पर्यवेक्षक, नवनियुक्त कार्यकारिणीचे सचिव नीरज आत्राम, उपाध्यक्ष सौ. रश्मी आरसे, सहसचिव अरुण चौधरी, आणि इतर सदस्य व माता पालक संघाची निवड सर्वानुमते करण्यात आली. या कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन, कर्मयोगी श्रद्धेय,बाबा आमटे व साधनाताई आमटे यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून, तथा स्वागतगीताने झाली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.गोपाल वरुटकर (पर्यवेक्षक) यांनी केले. त्यांनी प्रास्ताविकामध्ये पालक शिक्षक संघाचे कार्य, उद्दिष्टे, महत्व सविस्तर सांगितले. मागील वर्षाचे पालक शिक्षक संघाचे अहवाल वाचन प्रा. डॉ. मानसी काळे माझी सचिव यांनी केले.

           शिक्षकांचे मनोगत प्रा.अनिल तरोळे
यांनी विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून मोबाईलचे महत्व आणि दुष्परिणाम यावर भाष्य केले. पालकांमधून सौ.रश्मी आरसे,अरुण चौधरी, गिरीधर चवरे, मीनाक्षी नागरीकर,चंद्रहास मोरे, यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच नवनिर्वाचित शिक्षक सचिव नीरज आत्राम यांनी विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून काव्यातून आपले मनोगत व्यक्त केले. यानंतर महाविद्यालयात झालेल्या विविध स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले. या बक्षीस वितरण कार्यक्रमाची धूरा प्रा. एम. एम. मुंडे, यांनी पार पाडले.
             या कार्यक्रमाचे अध्यक्षीय मनोगत तथा मार्गदर्शन उपप्राचार्य, प्रा.राधा सवाने,यांनी केले. त्यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले की, पालक आणि शिक्षक यांना जोडणारा दुवा म्हणजे विद्यार्थी होय. सर्व विद्यार्थी व्यसनमुक्त राहण्यासाठी शिक्षक आणि पालकांची भूमिका महत्त्वाची असते, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आपण एकसंघ कार्य करूया तसेच विविध प्रसंगांचा दाखला देऊन पालक शिक्षक संघाचे महत्त्व पटवून दिले. या कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन प्रा. रमेश पळसुटकर सचिव यांनी केले. तर या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा. रमेश पवार केले.

        या कार्यक्रमाच्या यशस्वीते करीता महाविद्यालयातील सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद यांचा हातभार लागला. या कार्यक्रमाला बहुसंख्य पालकांनी उपस्थिती दर्शविली,या कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.