Chandrapur City News
• माता महाकालीच्या शोभायात्रेने महोत्सवाला थाटात सुरुवात!
सुवर्ण भारत: किरण घाटे (उपसंपादक)
चंद्रपूर:शहरातील जैन मंदिर येथून आज निघालेल्या शोभायात्रेने माता महाकाली महोत्सवाला थाटात सुरुवात झाली आहे.
सराफा असोसिएशनच्या वतीने ही शोभायात्रा काढण्यात आली होती. जैन मंदिर येथून शोभायात्रेला सुरुवात झाली. सदरहु शोभायात्रा आमदार किशोर जोरगेवार यांच्या निवासस्थानी पोहल्यानंतर आ. जोरगेवार यांनी सपत्निक दर्शन घेतले.
पाच दिवस चालणार असलेल्या श्री माता महाकाली महोत्सवाला आज पासून सुरुवात झाली आहे. सकाळी 9 वाजता सराफा असोशिएशनच्या वतीने जैन मंदिर येथुन शोभायात्रा काढली होती. या शोभायात्रेत माता महाकालीची चांदीची उत्सव मुर्ती ठेवण्यात आली होती.
शोभायात्रा शहराच्या मुख्य मार्गाने होत आमदार जोरगेवार यांच्या राजमाता निवासस्थानी दाखल झाली. यावेळी आमदार जोरगेवार यांनी सहपत्नीक मातेची पूजा करुन शोभायात्रेत सहभाग घेतला. शोभायात्रा महाकाली महोत्सव मंडपात पोहचल्या नंतर मुर्तीची विधीवत प्राणप्रतिस्थापना करण्यात आली.
