Home Breaking News Chandrapur city News • चंद्रपूरात विविध मागण्यांसाठी एक दिवसीय धरणे आंदोलन!...

Chandrapur city News • चंद्रपूरात विविध मागण्यांसाठी एक दिवसीय धरणे आंदोलन! • राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शरद पवार गटाने केले आंदोलन! • आंदोलनाकडे वेधले अनेकांचे लक्ष !

114

Chandrapur city News

• चंद्रपूरात विविध मागण्यांसाठी एक दिवसीय धरणे आंदोलन!
• राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शरद पवार गटाने केले आंदोलन!
• आंदोलनाकडे वेधले अनेकांचे लक्ष !

सुवर्ण भारत: किरण घाटे (उपसंपादक)

चंद्रपूर:विविध रास्त मागण्यांसंदर्भात गुरुवारी दुपारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाच्या वतीने एक दिवसीय धरणे आंदोलन पुकारण्यात आले.स्थानिक गांधी चौकातील मनपा कार्यालयाच्या प्रांगणात आज केलेल्या धरणे आंदोलनाकडे अनेकांचे लक्ष वेधले होते.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तडफदार युवा नेते राहुल देवतळे यांनी या पूर्वी देखील याच ठिकाणी रास्त मागण्यांसाठी आंदोलन केली होती. शहरातील अनेक भागात आज ही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायम आहे.मनपा प्रशासन या कडे सातत्याने दुर्लक्ष करत असल्याचा स्थानिक जनतेचा आरोप आहे.