Home Breaking News •प्रा. सुनंदा पाटील यांच्या ” पाचवा कोपरा ” कथासंग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कार...

•प्रा. सुनंदा पाटील यांच्या ” पाचवा कोपरा ” कथासंग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर ! • अनेकांनी केले पाटील यांचे अभिनंदन!

69

•प्रा. सुनंदा पाटील यांच्या

” पाचवा कोपरा ” कथासंग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर !
• अनेकांनी केले पाटील यांचे अभिनंदन!

सुवर्ण भारत: किरण घाटे (उपसंपादक)

विदर्भातील प्रतिष्ठित मानल्या जाण्याऱ्या साहित्य विहार संस्थेच्या वतीने लेखिका प्रा. सुनंदा पाटील यांच्या “जेष्ठ नागरिकांवर ” आधारीत कथा असलेल्या पाचवा कोपरा या कथासंग्रहाला सर्वोत्कृष्ट कथासंग्रह हा राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाल्याचे आज आयोजकांनी कळवले आहे.येत्या ३० नोव्हेंबरला एका समारंभात मान्यवरांच्या हस्ते नागपूर येथे तो पुरस्कार वितरीत केला जाणार आहे . लेखिका , अखिल भारतीय ” आम्ही लेखिका ” या लेखिकांच्या विश्वस्त संस्थेच्या अध्यक्ष आहेत. तद्वतच यांची लेखिका , कवयित्री , गझलकार आणि वक्ता अशी ओळख आहे. त्या “गझलांतंत्र कार्यशाळेचे ” आयोजनही करतात. सध्या त्यांचे गेल्या दीड वर्षापासून ” गझल आरस्पानी ” हे साप्ताहिक सदर दर शनिवारी ” तरूण भारत” आकांक्षा पुरवणीत प्रकाशित होत आहे.

प्रस्तुत कथासंग्रह “शब्दान्वय मुंबई” या प्रकाशन संस्थेने प्रकाशित केलेला आहे. संग्रहाचे वैशिष्टय म्हणजे या सर्व कथा जेष्ठ नागरिकांच्या समस्या , त्यावर आपण काय करू शकतो अशा संबंधीच्या पण सकारात्मक अशा आहेत. विशेष म्हणजे या पुस्तकाचे मुखपृष्ठ लेखिकेची आठ वर्षांची नात बालगायिका स्पृहा सागर पाटील मुंबई यांनी तयार केलेले आहे.

साहित्यिक क्षेत्रातून प्रा सुनंदा पाटील यांचे अभिनंदन केल्या जात आहे.