“ती…..एक स्त्री”
ती…..एक मुलगी
रचनाकार:- सौ.प्रियंका अ. बेंद्रे/पिंजरकर,चंद्रपूर
” ती…..एक स्त्री”
ती…..एक मुलगी
स्वच्छंद जगणारी
फुलपाखरासवे बागडणारी
सगळ्यांसोबत भातुकलीच्या खेळात रंगणारी
स्वतःच्या कल्पना विश्वात रमणारी…..।।
ती…..एक लेक
आई -बपाची लाडकी
मायाळू, सुसंस्कारी
हुशार, कर्तबगार
प्रत्येक क्षेत्रात स्वतःचे नाव कमावणारी…..।।
ती…..एक पत्नी
अर्धांगिनी, सहचारिणी
स्वावलंबी, स्वाभिमानी
सगळी नाती आपुलकीने जपणारी
पतीच्या प्रत्येक सुख:दुखात त्याला साथ देणारी……।।
ती…..एक आई
मुलांना जन्म देणारी
मुलांचे लाड करणारी
मुलांच्या प्रत्येक सुखांत स्त:चे सुख शोधणारी
मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी स्वतः:च्या स्वप्नांशीच तडजोड करणारी……
ती…..एक स्त्री जणू…..
त्यागाची मूर्ती……।।
