Home Breaking News बाप-लेक

बाप-लेक

23

⬜❕बाप-लेक❕⬜
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
लेक झाली की,
सगळ्यात पहिल्यांदा बाप खुश होतो
लेकीच्या उज्वल भविष्यासाठी
जीवनाचं रान करीन म्हणतो ।।धृ।।

लेकीच्या बोबड्या बोलण्यावर
बापाचे मन भूलते
तिच्या पैंजणाच्या छूमछूमनी
सर्वञ घर खुलते. ।।१।।

खुप शिकून मोठीं व्हावी
यासाठी करतो धडपड
प्रेमळ आहे मनाने
पण वरून दिसतो दगड. ।।२।।

लेकीच्या लग्नाच्या विचाराने
मन अस्वस्थ होते
लेक लाडकी बापाची
शेवटी सासरी जाते. ।।३।।

बाप लेकीच्या नात्याची
घट्ट आहे वीण
लेक सुद्धा बापासाठी
झुरते राञंदिन. ।।४।।

🔲🌀🔲सौ.प्रियंका अमित बेन्द्रे/पिंजरकर सहज सुचलं कलाकुंज सदस्य ⬜मो.नं.7558368887