Ghugus City#News
•आशा किरण बहुउद्देशीय संस्था घुग्घुस तर्फे सैनिकाच्या सत्कार व सांस्कृतिक कार्यक्रम
सुवर्ण भारत:पंकज रामटेक
सहाय्यक जिल्हा प्रतिनीधी चंद्रपूर
घुग्घुस : दि.२९ जानेवारी २०२५ बुधवार सांयकाळ रोज आशा किरण बहुउद्देशीय संस्था तर्फे प्रजासत्ताक दिनानिमित्त एक शाम देश के जवानो का नाम कार्यक्रम आयोजित करण्यात आले.
सर्वप्रथम विश्वरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर दिप द्विपजलीत करून,रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज,विश्वरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर व भारत मातेच्या प्रतिमेस द्विपजलीत करून पुष्पहार अर्पण सैनिकांनी व मान्यवरांनी अभिवादन करण्यात आले.
आशा किरण बहुउद्देशीय संस्थेचे सदस्यगण व प्रमुख पाहुणे मान्यवरांनी देशाचे सैनिक जवानाचे शाल,श्रीफळ,पुष्पगुच्छ व समान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आले.तसेच सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले.तसेच देश भक्ती नृत्य सादर करुन वीर सैनिकाला आदर सन्मान करण्यात आले.
तसेच आतीषबाजी करण्यात आले.तसेच लेझीम पथकांनी जोरदार सैनिक जवानाची स्वागत केले.
जोरदार धडक आशा किरण बहुउद्देशीय संस्था घुग्घुस वासीयांनी सैनिकाच्या सत्कार करून सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात कार्यक्रम समारंभ करण्यात आले.


