Home Breaking News • माळी महासंघाच्या ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी राकेश ठाकरेंची निवड • प्रदेशाध्यक्ष अरुण तिखे...

• माळी महासंघाच्या ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी राकेश ठाकरेंची निवड • प्रदेशाध्यक्ष अरुण तिखे यांनी दिले ठाकरेंना नियुक्ती पत्र ! •समाजबांधवांनी केले ठाकरेंच्या नियुक्तीचे स्वागत !

151

• माळी महासंघाच्या ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी राकेश ठाकरेंची निवड
• प्रदेशाध्यक्ष अरुण तिखे यांनी दिले ठाकरेंना नियुक्ती पत्र !
•समाजबांधवांनी केले ठाकरेंच्या नियुक्तीचे स्वागत !

मुल ( चंद्रपूर): किरण घाटे
माळी महासंघाच्या संघटनात्मक कार्याला गती मिळावी तदवतचं महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या कार्याला जिल्ह्यातील ग्रामीण भागात सर्व दूर पर्यंत पोहचावे या उदात्त हेतूने मुल येथील होतकरू व युवा धडाडीचे कार्यकर्ते, अनेक वर्ष युवा आघडीचा पदभार सांभाळणारे राकेश ठाकरे यांची माळी महासंघाच्या ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदी नुकतीच निवड करण्यात आली आहे.
माळी महासंघाचे प्रदेश अध्यक्ष अरुण तिखे यांनी त्यांना नियुक्ती पत्र देऊन त्यांचे अभिनंदन केले आहे.
दरम्यान समाज बांधवांनी त्यांच्या या नियुक्तीचे स्वागत करीत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत .
नुकत्याच पार पडलेल्या बैठकीला माजी जि.प.अध्यक्ष तथा महिला आघाडी प्रमुख संध्याताई गुरनुले, प्रदेश उपाध्यक्ष निलेश खरबडे, नगर सेवक रवी गुरनुले, माजी नगर सेविका वंदना तीखे, ऋषी कोटरंगे, सनिर केने , सूरज मांदाडे, बालगोविंद आदे, रुपेश निकोडे,ओमदेव मोहर्ले, विवेक मांदाडे आदिं उपस्थित होते.
एका होतकरू धडाडीच्या कार्यकर्त्याची जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती झाल्याबद्दल माळी महासंघाचे राज्य उपाध्यक्ष प्राचार्य डॉ.एस.एन. कोकोडे , सरचिटणीस चंद्रकांत बोरकर, मार्गदर्शक प्रा.रामभाऊ महाडोळे, विभागीय महासचिव गुरु गुरनुले, बंडूभाऊ गुरनुले, गुरुदास चौधरी, डॉ.पद्माकर लेंनगूरे, हसन वाढई, अनंत लेनगुरे यांचेसह माळी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी व समाज बांधवांनी राकेश ठाकरे यांचे अभिनंदन केले आहे.