आर्वी येथील सिद्धार्थ सार्वजनिक वाचनालयात
रंगला काव्य संवाद
सुवर्ण भारत:अर्पित वाहाणे
उपजिल्हा प्रतिनिधी, वर्धा
आर्वी:आर्वी सिद्धार्थ सार्वजनिक वाचनालय कन्नमवार नगर येथे काव्य संवाद या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे उद्घाटक प्रा. डॉ.अनिल भगत अध्यक्षस्थानी सुप्रसिद्ध आंबेडकरी गीतकार के. पाटील वर्धा हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून प्रा. राजेश सवाई व विश्वभूषण भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती आर्वीचे अध्यक्ष सुजित भिवगडे व नवयान चे अनिल तायडे हे होते.
कार्यक्रमाचे संवादक सुप्रसिद्ध कवियत्री व निवेदक स्नेहल सोनटक्के यवतमाळ व अमृता मनोहर तिवसा
या होत्या.
या कार्यक्रमाचे आयोजन शासनमान्य सिद्धार्थ सार्वजनिक वाचनालय आर्वी व विश्वभूषण भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर 133 वी जयंती उत्सव समिती आर्वी यांच्या वतीने करण्यात आले होते.
या कार्यक्रमा प्रसंगी युवा कवयित्री स्नेहल सोनटक्के यांनी आपला कवितेचा प्रवास विविध कवितांचे दाखले व जीवनातील प्रसंग सांगत उलगडून सांगितला.
तर अमृता मनोहर यांनी मनातील वेदनांना मोकळे करून देण्यासाठी आपण कविता लिहायला लागलो.
तसेच कविता ही समाजाचा प्रतिनिधित्व करीत असते. अशी प्रतिपादन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष के. पाटील यांनी
आंबेडकरी गीतकारांचा जलसा शाहिरांचा इतिहास आपल्या वक्तव्यातून मांडला. के .पाटील यांनी आपले पुस्तके ग्रंथालयाला भेट स्वरूप दिली. या कार्यक्रमाला प्रा. डॉ. विजयाताई मुळे ओमप्रकाश मनवर पाटील, नंदा पाटील, शुभांगी भिवगडे, ग्रंथालयाचे उपाध्यक्ष सहदेवराव भगत
कोषाध्यक्ष भानुदासजी फुसाटे, सदस्य रामदासजी नाखले, बंडूभाऊ पाचोडे, सिद्धांत ढाणके अक्षय राऊत गौरव कोल्हे
प्रफुल राऊत, गौरव बोबडे सुखदेवराव नंदागवळी आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सुत्र संचालन ग्रंथपाल सुरेश भिवगडे यांनी केले.
