• वरोऱ्यातील तालुका क्रीडा संकुलवर होत असलेला कार्यक्रम ठरतो आहे खेळाडूंच्या सरावात आडकाठी
सुवर्ण भारत: खेमचंद नेरकर
तालुका प्रतिनिधी,चंद्रपूर
वरोरा : शहरातील खेळाडूंना सराव करण्याकरिता एकमेव तालुका क्रीडा संकुल उभारले आहे.वेगवेगळ्या खेळांचा सराव करून आवडीच्या खेळात निपुण व तरबेज होण्याचा प्रयत्न करीत असतात. क्रीडा संकुलवर सराव करणाऱ्या अनेक खेळाडूंनी राज्यस्तरावर व राष्ट्रीय स्तरावर पोहचण्याचा इतिहास सुद्धा घडविला आहे. बहुतेक शैक्षणिक प्रवास करणारे विद्यार्थी शिक्षणासह आरोग्य सदृढ राहावे, तसेच खेळातून आपले उज्वल भविष्य घडावे या उद्देशाने नियमित आवडीच्या खेळांचा सराव करीत असतो. यातच विद्यार्थी विद्यालय, महाविद्यालय स्तरावर खेळला तर 10 गुण प्राप्त होतात. किंवा खेळाडूंनी खेळात विशेष प्रविण्य प्राप्त केले तर 20 गुणांचा शिक्षणात समावेश केल्या जात असतात. सदर क्रीडा संकुलवर दरवर्षी मनोरंजनाच्या कार्यक्रमाला प्रशासन मंजुरी देऊन विद्यार्थ्यांच्या भवितव्यासोबत खेळखंडोबा करतात. तसेच नियमित सराव करणाऱ्या खेळामध्ये खंड पडतात. कोणताही मनोरंजनात्मक कार्यक्रम घेण्यासाठी शहरात अनेक शासकीय, निमशासकीय मैदाने असून त्याठिकाणी प्रशासनाने मंजुरी द्यायला पाहिजे. परंतु नेमके क्रीडा संकुलवर प्रशासन परवानगी का देतात? हा संशोधनाचा विषय आहे. वास्तविक खेळाडूंच्या भावनेशी प्रशासनाने खेळणे हे गैर असून प्रशासनाने खेळाडूंच्या भावना लक्षात घेऊन मनोरंजनात्मक कार्यक्रमासाठी शहरातील इतरत्र खाली मैदाने देण्यात येऊन क्रीडा संकुल खाली करून पूर्ववत खेळाडूंसाठी मैदान उपलब्ध करून देण्यात यावे. यासंबंधी सामाजिक कार्यकर्ता आलेख रट्टे यांचे पुढाकाराने नियमित सराव करणाऱ्या खेळाडूंनी तहसीलदार तथा क्रीडा संकुल अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे.निवेदन देताना खेळाडू रितिक थेरे, मयूर पिजदूरकर, ओम गाऊत्रे, भूषण वेलेकर, निकुंज सोनटक्के यांची उपस्थिती होती.संबंधित प्रशासन कोणते पाऊल उचलतात याकडे खेळाडूंचे लक्ष लागले आहे.